
Sugar Price Hike : सध्या राज्यात साखरेचा भाव चांगालाच वाढला आहे. या भाववाढीमुळे सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा हा भाव वधारलाय. बाजारात झालेली ही भाववाढ पाहून सामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातही ही भाववाढ कायम राहिल्यास खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने मोठा निर्ण घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक परित्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना काही निर्देश देण्यात आले आहेत. विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ विक्री करता येईल, असा साखर साठा करता येणार नाही.
नेमका निर्णय काय झाला?
अन्न नागरी पुरवठा विभागाकडून साखरेच्या साठ्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार विक्रेता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करु शकणार नाही. कोणत्याही ठिकाणी ४,००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही.
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाचा परवाना धारक रेशन दुकानांना हा नियम लागू नसेल. येत्या 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यात हा निर्बंध लागू राहणार आहे.
Leave a Reply