• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?

August 25, 2026 by admin Leave a Comment


रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर पाठ ताठ होणे, कंबर दुखणे किंवा मान वळवताना वेदना जाणवणे अशी समस्या अनेकांना जाणवते. अनेकदा यामागे कामाचा ताण, चुकीची झोपण्याची पद्धत किंवा इतर कारणे असतील असे मानले जाते.

मात्र, वर्षानुवर्षे वापरली जाणारी जुनी आणि दबलेली गादीही झोपेची गुणवत्ता आणि शरीराच्या आरामावर परिणाम करू शकते. सतत वापरामुळे गादीच्या मधोमध खड्डा पडणे, एखादा भाग जास्त दबणे किंवा तिचा मूळ सपोर्ट कमी होणे ही गादी जुनी झाल्याची प्रमुख लक्षणे आहेत.

अशा गादीवर झोपताना शरीराला योग्य आधार न मिळाल्यास झोपण्याची स्थिती बिघडू शकते. परिणामी सकाळी उठल्यानंतर पाठ किंवा कंबरेत ताण जाणवण्याची शक्यता असते.

जुनी गादी केवळ आरामासाठीच नाही तर स्वच्छतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. अनेक वर्षांच्या वापरामुळे गादीमध्ये घाम, त्वचेचे मृत कण आणि धूळ साचू शकते. त्यामुळे धुळीतील सूक्ष्म कणांमुळे काही व्यक्तींना शिंका येणे, खाज किंवा अॅलर्जीचा त्रास जाणवू शकतो.

गादीचे आयुष्य तिचा प्रकार, गुणवत्ता, वापर आणि देखभाल यावर अवलंबून असते. साधारणपणे गादी 7 ते 10 वर्षांनी बदलण्याचा विचार करावा. मात्र, गादीमध्ये खड्डे पडले असतील, सपोर्ट कमी झाला असेल किंवा झोपल्यानंतर वारंवार अंगदुखी जाणवत असेल तर ठरावीक वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. ती लगेच बदलून घ्यावी.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!
  • Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in