
मोबाईलने लहान मुलांसह थोरामोठ्यांना देखील वेड लावले आहे. युट्युबवर एका चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील ११ आणि ७ वर्षांची दोन मुलांनी अचानक कोणाला न सांगता घर सोडले. घरातून मुले गायब झाल्याने त्यांच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर पोलिसांनी या मुलांना शोधण्यासाठी मोहिम सुरु केली आणि सुदैवाने ही मुलांना सुखरुपपणे त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात यश आले आहे.
काय आहे ’24-Hour सिक्रेट हाउस चॅलेंज’
पोलिसांनी या मुलांची चौकशी केली तेव्हा मुलांनी सांगितले की ते युट्युबवरील सीक्रेट हाऊस नावाचा गेमिंग कंटेन्ट पाहात होते. या ऑनलाईन ट्रेंडमध्ये चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना २४ तासांसाठी एक सीक्रेट रुम वा कोणतेही गुप्त स्थान तयार करुन कोणाच्याही नजरेस पडू न देता लपायचे असते.
या व्हिडीओ चॅलेंजने प्रभावित होऊन दोन्ही मुलांनी रविवारी दुपारी वास्तविक जीवनात २४ तास सीक्रेट हाऊस चॅलेंजला स्वीकारायचे ठरवले. आणि ही मुले कोणालाही काहीही कल्पना न देता घरातून गुपचूप बाहेर पडली.
रविवारी या मुलांना त्यांचे पालक सर्वत्र शोधू लागले. पालकांनी प्रत्येक नातेवाईकांना फोन करुन या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू मुलांचा कोणताही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांकडे मुले हरवल्याची तक्रार देण्यात आली. मवाना सर्कलचे ऑफीसर पंकज लवानिया यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून तात्काळ मिशन शक्तीच्या टीमला एक्टीव्ह केले आणि विभागात शोध मोहिम सुरु केली. काही तासांच्या मेहनतीनंतर पोलिसांनी आपले गुप्त नेटवर्क वापरुन या मुलांना शोधून काढले.
सिक्रेट चॅलेंज का धोकादायक
युट्युबवर सीक्रेट चॅलेंज सारखे गेमिंग व्हिडीओ खूप खतरनाक असू शकतात. खास करुन लहान मुलांसाठी. हे व्हिडीओ नेहमी मुलांना असली जीवनात नक्कल करण्यासाठी प्रेरित करतात. ज्यामुळे गंभीर दुर्घटना, बेपत्ता होणे, वा मृत्यू होऊ शकतो.
अशाच प्रकारे ब्लॅकआऊट चॅलेंज देखील आहे. उदा. चोकिंग चॅलेंज, पास-आऊट चॅलेंज, वा फेडिंग गेम देखील म्हणतात. हा एक जीवघातक सोशल मीडिया ट्रेंड आहे. ज्यात मुले आणि किशोर वयीन तरुण गळा दाबून किंवा श्वास रोखून बेशुद्ध होण्याचा प्रयत्न करतात. त्यामागे त्यांना वेगळ्या दुनियेचा अनुभव घ्यायचा असतो आणि तो व्हिडीओ शेअर करायचा असतो. या चॅलेंजची खतरनाक बाजू म्हणजे २०१० ते २०२४ मध्ये या चॅलेंजमुळे १,३८५ हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. ज्यात १२ वर्षांहून कमी वयाच्या २० मुलांचा समावेश आहे.
पालकांना आवाहन
आपल्या मुलांना अशा जीवघेण्या किंवा धोकादायक चॅलेंजपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या डिजिटल हालचालींवर आणि ते सोशल मीडिया आणि यूट्यूबवर कोणत्या प्रकारचा मजकूर पाहत आहेत यावर बारकाईने लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिस आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पालकांना केले आहे.
Leave a Reply