• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होणाऱ्या नवऱ्याबद्दल सारा तेंडुलकर हिचा मोठा खुलासा, म्हणाली, तो..

August 10, 2026 by admin Leave a Comment


भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर कायमच चर्चेत असते. सारा तेंडुलकर हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसते. मात्र, यावर सारा तेंडुलकर कधीच भाष्य करताना दिसली नाही. आता पहिल्यांदाच सारा तेंडुलकर हिने तिच्या नातेसंबंधांवर आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल मोठे विधान केले. मनसोक्त गप्पा मारताना सारा तेंडुलकर दिसली. सारा तेंडुलकर हिने व्होग इंडियाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या आई वडिलांबद्दल होणाऱ्या पतीबद्दल आणि लग्नाबद्दल मोठा खुलासा केला.

सारा तेंडुलकर हिने म्हटले की, माझे आई वडील सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्या नात्यात एक खेळी मेळीचे वातावरण राहिले आहे. चेष्टा मस्करीने आणि आनंदाने बहरलेले त्यांचे नाते आहे. मी लहानाची मोठी होत असताना मी त्यांचे हे सर्व नाते अगदी जवळून बघितले. त्यामुळे जोडीदाराबाबत माझ्या काही अपेक्षा आहेत. माझे आई वडील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ते खूप चांगले मित्र आहेत.

त्यांच्यात कायमच एक हलकी फुलकी खडाजंगी असते. मला मुळात म्हणजे माझ्या होणाऱ्या जोडीदारासोबत तसेच नाते हवे आहे. सारा तेंडुलकर ही तिच्या आई वडिलांच्या नात्याकडे एक आदर्श नाते म्हणून बघते. आपल्या लग्नाबद्दल आणि आपल्याला पती कसा हवा आणि नाते कसे असावे, याबाबत स्पष्ट बोलताना सारा तेंडुलकर दिसली आहे. सचिन आणि अंजली तेंडुलकर आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवतात.

सारा तेंडुलकर हिने पुढे म्हटले की, फक्त इतरांच्या अपेक्षा किंवा याच ठराविक काळात लग्न करायचे म्हणून लग्न घाई घाईत करण्याची माझी तयारी नाही. तरुण पिढीच्या नातेसंबंधांकडे पाहण्याचे दृष्टिकोन कसे आहेत. यावर बोलताना सारा तेंडुलकर हिने म्हटले की, जेव्हा एखादी गोष्ट योग्य वाटत नाही, तेव्हा त्यातून बाहेर पडणे किंवा संबंध तोडणे जेनजींसाठी सोपे आहे.

मी बऱ्याचदा बघितले आहे की, साखरपुडा झाल्यानंतर ज्यावेळी लग्नाची तयारी सुरू असते, त्यावेळी काहीजण म्हणतात की, मला हे पुढे चालू ठेवण्याची इच्छा नाही. लग्नाअगोदरच यातून बाहेर पडणे चांगले ठरते. साराने पुढे म्हटले की, अगोदरच्या पिढ्यांना आपली भूमिका मांडताना भीती वाटायची. पण आता याउलट चित्र आहे. जेनजींमध्ये तसे दिसत नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in