
सध्या श्रावण महिन्यामुळे वातावरणात पावसाची रिमझिम, गारवा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशा या प्रेमळ वातावरणात गाणी ऐकण्याची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता असते. यूट्यूबवर पावसामधील गाणी शोधताना आजही एक जुने गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे गाणं म्हणजे 'सावन में'. हे प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या आवाजातील गाणं आहे. तब्बल 25 वर्षांपूर्वी रिलीज झालेले हे गाणं आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. फाल्गुनी पाठक यांच्या ‘सावरिया तेरी याद में’ या अल्बममधील हे गाणं 2001 मध्ये प्रदर्शित झाले होते.
‘सावन में मोरनी बन के, मैं तो छम-छम नाचूं…’ या लोकप्रिय ओळींमुळे हे गाणं विशेष गाजले. फाल्गुनी पाठक यांच्या दमदार आणि सुरेल आवाजामुळे या गाण्याला वेगळीच ओळख मिळाली. पावसातील वातावरणाशी आणि प्रेमाच्या भावनेशी जोडले गेलेले हे गाणं आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये श्वेता अग्रवाल आणि अनिरुद्ध प्रताप झळकले होते. गाण्याच्या संगीतासोबतच त्यातील कलाकारांचा अभिनय आणि सुंदर वातावरण यामुळे गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
विशेष म्हणजे, काळ बदलला, नवी गाणी आली आणि संगीताचा ट्रेंडही बदलला; मात्र फाल्गुनी पाठक यांचे ‘सावन में’ गाणं आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. त्यामुळे या गाण्यांचा शोध घेताना हे 25 वर्षे जुने गाणं आजही प्रेक्षकांच्या यादीत आघाडीवर दिसते.




Leave a Reply