• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vikram-1 Rocket: अंतराळात इस्त्रो रचणार इतिहास, विक्रम-1 अवकाशात झेपावणार, अमेरिका आणि चीनच्या क्लबमध्ये भारताचा समावेश

July 18, 2026 by admin Leave a Comment


Vikram-1 Rocket Launch Today : भारत अंतराळ क्षेत्रात अजून एक मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. शनिवारी 18 जुलै रोजी इस्त्रो अजून एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. हैदराबाद येथील एक खास अंतराळ कंपनी स्काईरूट एअरोस्पेस , तिच्या कक्षीय प्रक्षेपण वाहक (Orbit lunch Vehicle) विक्रम- 1 अंतराळात पाठवणार आहे. ‘आगमन’ असे समर्पक नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. अगदी थोड्याच वेळात सकाळी 11:30 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून (SDSC-SHAR) विक्रम अंतराळात विक्रम रचणार आहे. पहिल्यांदाच एखादी भारतीय खासगी कंपनी स्वत: विकसीत केलेल्या कक्षीय प्रक्षेपण वाहकाच्या मदतीने उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापन करणार आहे.

विक्रम-1 चे वैशिष्ट्य काय?

भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक आणि अंतराळ कार्यक्रमाचे दृष्टे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावाने हे रॉकेट विकसीत करण्यात आले आहे. हे प्रक्षेपण वाहक 24 मीटर लांब आहे. विक्रम-1 रॉकेट पूर्णपणे हलक्या कार्बन कॉम्पोझिटने तयार करण्यात आलेले आहे. हे प्रक्षेपण वाहक तीन घन इंधन आणि एका द्रव इंधनाच्या मदतीने ऑर्बिटल ॲडजस्टमेंट मॉड्यूल काम करेल. त्याची क्षमता जवळपास 350 किलो पेलोडला 450 किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या निम्नस्तरावरील कक्षेत स्थापन करेल. डायमंड लोटस नावाचे पेलोड हे बंगळुरू येथील कंपनी कॉसमॉस डायमंड्सने प्रयोगशाळेत तयार केले आहे.

यापूर्वी 2022 मध्ये ‘विक्रम-S’ ही स्कायरूट मोहिम आणि त्यानंतर प्रारंभ ही उप कक्षीय मोहिमेच्या यशानंतर स्कायरूटचे हे मोठे पाऊल मानल्या जाते. आता कंपनीने आगमन या नावाने नवीन मोहीम हाती घेतली आहे. कक्षीय प्रक्षेपण वाहकाच्या मदतीने कंपनी उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास व्यावसायिक प्रक्षेपण क्षेत्रात क्रांती होईल आणि इतर कंपन्यांसाठी अंतराळाचे दरवाजे खुले होतील. व्यावसायिकदृष्ट्या प्रक्षेपण वाहनाच्या उद्योगाला चालना मिळेल.

A historic new frontier for India’s space journey!

At 11:30 AM today, Skyroot Aerospace will undertake the maiden orbital launch of Vikram-1, India’s first privately developed launch vehicle.

This four-stage rocket is designed to provide rapid and on-demand launch services.… pic.twitter.com/1qFVTwNOuZ

— Narendra Modi (@narendramodi) July 18, 2026

हा तर ऐतिहासिक नवीन टप्पा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे. आज सकाळी 11.30 वाजता स्कायरूट एअरोस्पेस विक्रम-1 या भारतातील पहिल्या खासगी क्षेत्रातील विकसीत कक्षीय प्रक्षेपण वाहकाचे पहिले प्रक्षेपण करणार आहे. चार टप्प्यांमध्ये जलद आणि मागणीनुसार उपग्रह प्रक्षेपण सेवा देण्यासाठी हे रॉकेट विकसीत करण्यात आले आहे. ही मोहिम आपल्या युवा पिढीची प्रतिभा, जिद्द आणि उद्योजकीय विजुगुषीचे प्रतिक असल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी या मोहिमेसाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फडणवीसांनी पंकजांना मुख्यमंत्री करून दाखवावे, राहुल यांना उपदेश नको, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
  • अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आंतराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..
  • Vastu Shastra : या तीन वस्तू कधीच कोणाला करू नका दान, घरात येईल गरीबी
  • नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, बाधितांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप
  • व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी करायचे होतं नको ते चाळे.. त्या हत्याकांडाची भयानक कहाणी !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in