• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी करायचे होतं नको ते चाळे.. त्या हत्याकांडाची भयानक कहाणी !

August 31, 2026 by admin Leave a Comment


राज्यासह देशभरात गुन्ह्यांच्या घटना वाढल्याचं समोर आलं आहे. असाच एक अतिशय भयानक प्रकार उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये घडला. 22 वर्षांच्या गर्लफ्रेंडवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप 23 वर्षांच्या तरूणावर आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, आरोपीने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. तिथे त्यांना लैंगिक उत्तेजना वाढवण्याचं औषध घेतलं आणि त्या तरूणीवर अत्याचरा केला असाही आरोप आहे. एवढंच नव्हे तर त्याने त्या तरूणीशी दुसऱ्यांदा पुन्हा जबरदस्ती संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याला विरोध दर्शवला. त्यानंतर नराधम आरोपीने तिची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणी 22 वर्षांची असून ती मूळची फिरोजाबादची रहिवासी होती. गुरुग्रामच्या एका क्विक ई-कॉमर्स कंपनीत ती काम करत होती. रक्षाबंधनाच्या दिवशी ती गावी जाणार होती. मात्र तेव्हाच 23 वर्षांच्या आरोपीने 26 ऑगस्ट रोजी तिला भेटायला बोलावलं, त्यातच दिवशी त्याचा वाढदिवसही होता.

एकमेकांनाआधीपासूनच ओळखत होते दोघे

पोलिसांच्या सांगण्यानुसार, आरोपी आणि मृत तरूणी 12 वी पर्यंत एकत्र शिकले, ते एकमेकांना ओळखत होते. नंतर तरूणीने बीएससीचं शिक्षण घेतलं आणि नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती क्विक ई-कॉमर्स डिलीव्हरी ॲपशी निगडीत कंपनीत काम करत होती. तर आरोपी तरूण हा स्थानिक रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी त्या दोघांमधील नातं आणि या घटनेपूर्वी त्यांच्यात काय बोलणं झालं याचा तपास सुरू केला आहे.

आरोपीने तिला भेटायला बोलावलं आणि घरी जाऊ दिलं नाही, असं पोलिसांनी दिलेल्या माहितीतून समोर आलं. त्यानंतर आरोपी त्या तरूणीला घेऊन फिरोजाबादच्या एका हॉटेलमध्ये गेला. त्या हॉटेलमध्ये आरोपीने लैंगिक उत्तेजना वाढवण्याचं औषध घेतलं, असा आरोप आहे. त्यानंतर त्याने त्या तरूणीवर कथितरित्या अत्याचार केला, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडे त्या तरूणीचा मोबाईल आणि लैंगिक उत्तेजना वाढवण्याचं औषध सापडलं. आरोपीने ते औषध घेतल्याचं आणि तरूणीवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. मात्र केस मजबूत करण्यासाठी पोलिस आणखी काही गोष्टींचाही तापस करत असून पुरावे गोळा करत आहेत.

27 ऑगस्टला पुन्हा त्याला.. 

ही घटना 26 ऑगस्टला घडल्याचे सांगितलं जात आहे. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्टच्या सकाळी आरोपीने त्या तरूणीशी पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा त्या तरूणीने त्याला विरोध दर्शवला. त्यामुळे नाराज झालेल्या आरोपीने तिला मारहाण केली आणि तिची हत्या केली, असा आरोप आहे. या घटनेत तरूणीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि अतंर्गत रक्तस्त्रावर झाल्यामुळे तिचा जीव गेल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यावर त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe : मोठी बातमी! सरकारने तुकाराम मुंढेंचा निर्णय फिरवला, सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ
  • आधी संविधानाचा अभ्यास करा, प्रोटोकॉलनुसार…मोदींच्या फोटोवरून कृष्णराज महाडिकांनी अमित ठाकरेंना सुनावलं!
  • ऑपरेशन करण्यापूर्वी इथे डॉक्टर सर्वातआधी रुग्णांची जात विचारतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
  • 38 वर्षांपासून कोर्चात ससेहोलपट, आरोपी गेला तो आलाच नाही; पण वृद्ध पोलिसांचे प्रचंड हाल, साताऱ्याच्या खटल्याची देशात चर्चा
  • Ola ने लॉन्च केली नवीन स्कूटर, एका चार्जमध्ये धावणार 301 किमी, किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in