• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऑपरेशन करण्यापूर्वी इथे डॉक्टर सर्वातआधी रुग्णांची जात विचारतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

September 1, 2026 by admin Leave a Comment


एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर सामान्यपणे त्या व्यक्तीची आरोग्यस्थिती जाणून घेतो. ऑपरेशन करण्यापूर्वी संबंधित रुग्णाचा बीपी किती आहे? शुगर किती आहे? त्याचा रक्तगट कोणता आहे? या सर्व गोष्टींची नोंद ठेवली जाते. तसेच पूर्वी या व्यक्तीला एखादा आजार होता का? त्याची मेडिकल हिस्ट्री देखील चेक केली  जाते. ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टर संबंधीत रुग्णाच्या बदलत जाणाऱ्या आरोग्याच्या बाबतीत बारीक -बारीक तपशीलाची देखील नोंद करून ठेवलात. आणि त्यानंतर रुग्णाचं ऑपरेशन करण्यासाठी त्याला भूल दिली जाते.

परंतु तुम्ही कधी असं ऐकलं आहे का? की अशेही काही रुग्णालय आहेत, जिथे रुग्णाला ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारली जाते? हे तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल परंतु ही गोष्ट सत्य आहे, भारतामधील असे काही भाग आहेत, जिथे रुग्णाला ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारली जाते. त्या मागचं कारण देखील तितकचं महत्त्वाचं आहे.

तामिळनाडू, आध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक सारख्या काही राज्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या काही विशिष्ट समाजामध्ये जसं की, आर्य वैश्य तसेच कोमुट्टी चट्टियार समाजाच्या लोकांमध्ये अनुवंशिकपणे स्यूडोकोलिनस्टेरेज (Pseudocholinesterase)  नावाच्या एन्झाइमची कमतरता आढळते, जवळपास सर्वच लोकांमध्ये ही समस्या आढळते. यामुळे होतं असं की, जेव्हा ही समस्या एखाद्या व्यक्तीला असते, तेव्हा त्या व्यक्तीला भूलीचं इजेक्शन दिल्यानंतर त्याचा परिणाम हा इतर रुग्णांच्या तुलनेत खूप जास्त काळ  राहतो. अशा स्थितीमध्ये संबंधित रुग्णाच्या शरीरात काही गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. ही रीस्क टाळण्यासाठीच तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या सारख्या राज्यात काही रुग्णालयांमध्ये ऑपरेशन करण्यापूर्वी रुग्णाची जात विचारली जाते. या संदर्भात एका वृत्तवाहिनी माहिती दिली आहे.

त्या अनुषंगाने अधिक काळजी घेणं डॉक्टराला सोपं जातं. रुग्णाच्या शरीरात ऑपरेशन करण्यापूर्वी नेमकं किती भुलीचं औषध इजेक्ट करायचं आहे, याची मात्र ठरवता येते. त्यामुळे काही ठिकाणी डॉक्टर रुग्णालचं ऑपरेशन करण्यापूर्वी त्याची जात विचारतात, आणि त्यानुसार योग्य ते उपचार सुरू करतात.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माझ्या लेकराची आण घेऊन सांगतो की शिंदे साहेब… शहाजी पाटील यांनी जरांगेंना भेटून घेतली शपथ
  • 2 सप्टेंबर दुपारी 1 वाजून 46 मिनिटानंतर सावधान! ‘या’ राशींनी काळजी, तर ‘या’ राशींचे नशीब फळफळणार
  • मोठी बातमी! तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का, माजी नगराध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश
  • Weather Update : मळभ सरलं, महाराष्ट्रात पाऊस परतणार या दिवसापासून धो-धो बरसणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
  • आश्रमशाळेतील वरणात पाल पडल्याने 31 विद्यार्थी अत्यवस्थ, मळमळ- उलट्यांचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in