• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्या लेकराची आण घेऊन सांगतो की शिंदे साहेब… शहाजी पाटील यांनी जरांगेंना भेटून घेतली शपथ

September 1, 2026 by admin Leave a Comment


आंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. आज मनोज जरांगे यांना भेटायला एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील आले होते.त्यांनी यावेळी व्यासपीठावर पांडुरंगाची शपथ घेत सांगितले की एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना आपला मुलगा दिग्विजय याची शपथ घेऊन सांगतोय की एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी तळमळीने काम करत आहेत.

आमदार शहाजी पाटील यांनी आज मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळावर त्यांना भेट देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनोज जरांगे यांची अवस्था पाहून ते हेलावले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. शहाजी पाटील यावेळी म्हणाले की पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, की एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणसाठी अतिशय तळमळी प्रयत्न करत आहेत. थोड्या वेळाने त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की पांडुरंग नाही तर माझ्या मुलाची दिग्विजयची शपथ घेवून सांगतो. एकनाथ शिंदे हे तळमळीने प्रयत्न करत आहेत…

ते पुढे म्हणाले की आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत. आम्हाला कोणाचं नको आहे. जर तुम्हाला आता कुणबी ओबीसीमध्ये नको आहेत. तर मग ७० वर्षापूर्वी आम्हाला कुणबीत कशाला टाकल ? असा सवालच त्यांनी यावेळी केला. यातील सगळे कागदपत्रे ही मोडी लिपीत आहेत ते जर शोधायचे म्हटला तर मोडीवाला माणूस शोधावा लागतोआता आमच्या व्हॅलिडिटी बोकांडी कशाला टाकली आहे ? ज्याच्या आज्याचं आहे, त्याच्या नातवाला लाभ मिळाला पाहिजे ना असेही शहाजी यावेळी म्हणाले.

लक्ष्मण हाके, यांच्या ओबीसी आंदोलनाबद्दल विचारले असता शहाजी बापू म्हणाले की ही सगळी नौटंकी चालली आहे. इथे सगळ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ५४ लाख कुणबी नोंदी प्रमाणे प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच जातपडताळणी समितीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. २९ ऑगस्ट पासून ते आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सरकारला कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरुन जाब विचारत हे आंदोलन सुरु केले आहे. जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घुसतील अशा इशारा दिला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंचा विषय खोल! कर्मचाऱ्याची वाढलेली नखं दिसताच थेट लायसन सस्पेंड; FDA ने तडकाफडकी….
  • ‘दहशतवादी त्यांची हत्या करणार,’ केंद्रीय मंत्र्याला थेट धमकी आल्याने खळबळ; दिल्लीत सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर!
  • पार्टीत जास्त चिकन खाल्लं म्हणून भडकला, मित्रच मित्राच्या जीवावर उठला, अखेर…
  • Chanakya Niti : ज्यांच्या मुलांमध्ये असतात हे गुण ते आई-वडील भाग्यवान, चाणक्य काय म्हणतात?
  • इमरान हाश्मीसोबत इंटीमेट-किसिंग सीन देणाऱ्या तनुश्री दत्ताने नात्याबाबत केला मोठा खुलासा, थेट म्हणाली- ‘आम्ही दोघं..’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in