
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करत असतो. ग्रहांच्या या स्थितीला गोचर असं संबोधलं जातं . सप्टेंबर महिन्यात काही ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. त्यामुळे काही योग जुळून येणार आहेत. त्याचा राशीचक्रावर चांगला वाईट परिणाम होताना दिसणार आहे. 2 सप्टेंबरला शुक्र ग्रह स्वत:चं स्वामित्व असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी कन्या राशीतून तूळ राशीत संक्रमण करणार आहे. शुक्र या राशीत 3 ऑक्टोबर 2026 च्या मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यानंतर वृश्चिक राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रह एक महिना तूळ राशीत राहणार असून या काळात अत्यंत शुभ मानल्या गेलेला मालव्य राजयोग तयार होणार आहे. या स्थितीमुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. कोणत्या राशी लकी ठरणार ते जाणून घेऊयात..
शुक्राच्या गोचरामुळे या राशींना मिळणार लाभ
- मेष : शुक्राचे गोचर सातव्या स्थानात होत असल्याने या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. जोडीदाराकडून तुम्हाला या कालावधीत चांगली साथ मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा होईल, रखडलेली कामे पूर्ण होतील.
- मिथुन: या राशीच्या पाचव्या स्थानात शुक्र एन्ट्री मारणार आहे. त्यामुळे हा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या बदलामुळे करिअर आणि शिक्षणात अपेक्षित बदल पाहायला मिळतील. आर्थिक फायदा होईल, नवीन नोकरीच्या संधी चालून येतील आणि कौटुंबिक आनंद वाढेल.
- तूळ : शुक्र या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे पहिल्याच स्थानात असणार आहे. त्यामुळे या कालावधीत व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक होईल. समाजात मानसन्मान वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्यात सुधारणा होईल.
- मकर : या राशीच्या कर्मस्थानात म्हणजेच दहाव्या भावात शुक्र विराजमान होणार आहे. या गोचरामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. नवीन व्यावसायिक करार होतील आणि रखडलेले पैसा परत मिळण्याची शक्यता आहे.
- कुंभ: या राशीच्या लाभस्थानात शुक्र विराजमान होणार आहे. त्यामुळे भाग्योदयात वाढ होईल. धार्मिक कार्यात अधिक हिरिरीने भाग घ्याल. या कालावधीत परदेश प्रवासाचे योग जुळून येतील. तसेच नशिबाची पूर्ण साथ लाभेल
या राशींनी जरा सावधच
कर्क, सिंह आणि वृषभ राशीच्या जातकांना शुक्र गोचराच्या कालावधीत जरा काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्यावी. वडिलधाऱ्या व्यक्तींचा किंवा कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या कालावधीत विनाकारण पैसे खर्च होण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन करावे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे.
शुक्राचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत. या काळात दररोज किंवा दर शुक्रवारी ‘ॐ शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा. या काळात पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
Leave a Reply