
राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम झुट की गुंज आहे. ते खरे तर महिला आरक्षणाचे मारेकरी आहेत. महिला आरक्षण कायद्याचा राहुल गांधींनी शिरच्छेद केला. त्यांनी आधी प्रियंका गांधी यांना संधी द्यायला हवी होती अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीकास्र सोडले आहे. राहुल कौन ?म्हणणाऱ्यांना आता जळी,स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त राहुल गांधीच दिसत आहेत! त्यांना महिलांना संधी देण्याचा ढोंगी उपदेश करण्यापूर्वी फडणवीस यांनी आधी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करुन दाखवावे, गेट वेल सून फडणवीस साहेब अशा शब्दात काँग्रसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
आज एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली होती. राहुल गांधी महिला आरक्षणाचे मारेकरी आहे. “महिला आरक्षणाला विरोध करणारे कांग्रेस आणि त्यांचे घटकपक्ष होते. आधी तुम्ही पाठिंबा दिला होता तर आता का विरोध करताय ? राहुल गांधी रोज खोटं बोलताहेत. आधी राममंदिराला विरोध केला. आता दानपेटीतील चोरी निमित्ताने बदनामी करत आहे असा घणाघात फडणवीस यांनी राहुल गांधींवर केला होता. त्याला आता काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या टीका करणारी पोस्टच काँग्रसेचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट जशीच्या तशी…
‘कौन राहुल?’ म्हणणाऱ्यांची अवस्था आता अशी झाली आहे की जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना फक्त राहुल गांधीच दिसत आहेत! ‘छात्रों की गुंज’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने भाजपाची झोप उडाली आणि देवेंद्र फडणवीसांचा जळफळाट सुरू झाला आहे.
महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा डाव रचून देशाचे राजकीय गणित बदलण्याचा भाजपाचा मनसुबा काँग्रेसने हाणून पाडला, म्हणूनच फडणवीसांना एवढी मिरची झोंबली आहे!
महिलांना संधी देण्याचा ढोंगी उपदेश करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करून दाखवावे! आणि वंदे मातरमवर राजकारण करण्यापूर्वी RSS च्या शाखेत ते गायला सुरू करावे.
फडणवीस साहेब, खोट्याची कितीही फेकाफेक केली तरी राहुल गांधींचा झंझावात थांबणार नाही… जरा वास्तव स्वीकारा आणि स्वतःच्या राजकीय अस्वस्थतेवर उपचार करा..
गेट वेल सून फडणवीस साहेब..!
Leave a Reply