
महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढण्याला प्राधान्य, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, नाव न घेता प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. शिंदेंची शिवसेना मुंबई बँकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची बाब समोर येते. विसंवाद कसा होईल ते काही लोकं बघतायत, असंही दरेकर यांनी म्हटलंय. कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असतील, तर त्या महायुती म्हणून एकत्रित लढवण्याचा त्या ठिकाणी आमचा नेहमी प्राधान्य राहिलेलं आहे. आता काही लोकं गुडघ्याला बाशिंग बांधून त्या ठिकाणी जर बसले असतील तर त्यातनं आलेलं ते ज्यांना मुंबई बँकेची प्रगती ज्या पद्धतीने होतेय, अनेक प्रकारच्या योजना माझ्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली नेल्या. त्याच्यामुळं काही लोकांना असूया आहे आणि मग चांगल्या चाललेल्या बँकेमध्ये मतभेद किंवा विसंवाद कसा होईल, याचा प्रयत्न आहे. मला मुंबई बँकेच्या निवडणुकीबद्दलची कल्पना नाही. माननीय शिंदे साहेबांच्या बद्दल किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल याची माझी चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतर मी आपल्याला सांगेन.
Leave a Reply