
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात काही वास्तूदोष निर्माण झाले असतील तर ते दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा एखाद्याच्या घरात वास्तूदोष निर्माण होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण होतात, जसं की, पती-पत्नीचं पटत नाही. घरात काहीही कारण नसताना विनाकारण वाद निर्माण होतात. घर अशांत राहतं, तुम्ही दिवस रात्र कष्ट करून कितीही पैसा कमावला तरी तो तुमच्या हातात टिकत नाही. या सारख्या समस्या दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात काही वस्तू अशा असतात, ज्या कधीही दान करू नये, त्यामुळे घरात गरिबी येते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे, त्याबद्दल.
झाडू – तुम्ही तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी दररोज जो झाडू वापरता तो झाडू कधीही कोणालाही दान करू नका, कारण यामुळे घराला कधीही बरकत प्राप्त होत नाही. घरात पैसा टिकत नाही, तसेच तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणींचा सामाना करावा लागू शकतो. त्यामुळे घरातील झाडू कोणालाही दान करू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. तसेच घरातील झाडू हा कधीही उभा करून ठेवू नये, घरातील झाडू हा नेहमी अडवा असावा असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
दही – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात जे दूधापासून दही बनवता ते देखील कोणालाही कधीही दान करू नका असं वास्तुशास्त्र सांगतं. कारण दह्याला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे घरातील दही कोणालाही कधीही दान करू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
कात – झाडू आणि दह्या प्रमाणाचे तिसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कात. कात देखील कधीही कोणाला दान करू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply