
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेताना मेस्सी म्हणाला की, “हा निर्णय घेताना मला खूप त्रास झाला आणि अजूनही होतोय, पण आता थांबण्याची वेळ आली आहे. मी या जर्सीसाठी आणि देशासाठी माझे सर्वस्व पणाला लावले, आता माझ्याकडे देण्यासारखे काही उरलेले नाही. आता संघात अनेक प्रतिभावान तरुण खेळाडू येत असून ते या जागेसाठी पात्र आहेत.”
Leave a Reply