
अनेकदा असं होतं की आपल्यासाठी एखादं काम हे खूप महत्त्वाचं असतं. आपण ते पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. मात्र वारंवार हे काम पुढं ढकललं जातं किंवा ते काम पूर्ण होण्यास विलंब होतो. अनेकदा तर आपल्याला असं देखील वाटतं की, आता हे काम झालचं आहे, परंतु ऐनवेळी कामात काही अडथळे निर्माण होतात आणि ते काम अपूर्णच राहतं, यामुळे तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानाचा देखील सामना करावा लागतो. हे असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर यामागे तुमच्या घरात निर्माण झालेली नकारात्मक शक्ती असू शकते. जर तुम्हालाही महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
गुरुवारी करा हे उपाय – जर तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुम्ही गुरुवारी तुमच्या घराच्या शेजारी असलेल्या भगवान दत्तांच्या मंदिरामध्ये जा, दत्तांची मनोभावे पूजा करा, प्रसाद अर्पण करा. तुम्ही सलग 11 गुरुवार हा उपाय केल्यास तुम्हाला भगवान दत्त यांचा आशीर्वाद मिळतो, तसेच तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
गुरुवारी पेढे दान करा – गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, मंदिरात जाऊन भगवान दत्तात्रय यांची पूजा करावी. त्यानंतर त्यांना पिवळ्या पेढ्याचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच तुमच्या परिसरातील जे गरजू लोक आहेत, त्यांना तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार पिवळ्या पेढ्यांचं दान करावं. सलग 11 गुरुवार हा उपाय केल्यास तुमची सर्व कामे मार्गी लागतील असा सल्लाही वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.
काळ्या तीळाचे दान – अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला शनी महाराजांची साडेसाती असते, अशावेळी दर शनिवारी पहाटे उठून अंघोळ करावी, शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचं दर्शन करावं, त्यांना काळे तीळ आणि तेल अर्पण करावं. तसेच त्यानंतर गरजू व्यक्तींना तिळाचं दान करावं, यामुळे शनी देव प्रसन्न होतात. सर्व प्रकारच्या अडचणीमधून तुम्हाला मुक्ती मिळते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
पिंपळाच्या झाडांना प्रदक्षिणा – अनेकांना पितृदोषाची देखील समस्या असते, त्यामुळे कामात अडथळे येतात. पितृदोष दूर करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात, यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply