
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कधी वधारताना तर कधी कमी होताना दिसत आहे. सध्या सोन्याचा भाव अक्षय्य तृतीयेनंतर कमी झाला आहे. 24 कॅरेट सोनं स्वस्त झालं आहे.
गुड रिटर्न्स या शेअर बाजाराविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार 19 एप्रिलच्या तुलनेत सोन्याचा भाव कमी झाला आहे. 19 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 15578 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. आता हाच सोन्याचा भाव 15529 रुपये प्रति 1 ग्रॅमपर्यंत खाली आला.
तोळ्याचा हिशोब करायचा झाल्यास 19 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 155780 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 20 एप्रिल रोजी 155290 रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच एका तोळ्यामागे सोन्याचा भाव 490 रुपयांनी कमी झाला आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. त्यामुळे जागतिक बाजारातील अस्थिरता अद्याप कायम आहे. म्हणूनच आता आगामी काळात सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार, असे उत्सुकतेने विचारले जात आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)




Leave a Reply