• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : यशस्वी लोकांकडे असतात या पाच सवयी; चाणक्य काय म्हणतात?

April 20, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात यश मिळवणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. कोणत्याच व्यक्तीला असं सहज यश मिळत नाही. कोणत्याही कामात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हा त्याची किंमत मोजावी लागते, त्याग करावा लागतो. परिश्रमामध्ये सातत्य ठेवावं लागतं, तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. पुढे चाणक्य असं देखील म्हणतात की यशस्वी होण्यासाठी केवळ कष्टच महत्त्वाचे नसतात. तर दिशा देखील महत्त्वाची असते, जर तुम्ही चुकीच्या दिशेनं प्रयत्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही. जो माणूस आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो, त्या प्रत्येक माणसांकडे असे पाच गुण असतात, ज्याच्या बळावरच तो हे यश संपादन करतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिस्त – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त नावाची गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेच आहे. जर तुमच्या कामामध्ये शिस्त नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. मात्र जर तुमच्या कामात शिस्त असेल तर या जगातील कोणताही व्यक्ती तुम्हाला तुमच्या यशापासून थांबवू शकणार नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आत्मविश्वास – चाणक्य म्हणतात जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही या जगात कोणतीही गोष्ट सहज मिळू शकतात, त्यामुळे तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं असतं.

निश्चय – चाणक्य म्हणतात माणसाकडे निश्चय पाहिजे, जर तुम्ही ठरवलं मला एखादी गोष्ट मिळवायची आहे, मग ती मिळेपर्यंत कधीही मागे हटू नका, असा सल्ला चाणक्य देतात.

शांत स्वभाव – चाणक्य म्हणतात जे लोक रागीट असतात ते हाताने आपलं वाटोळं करून घेतात, त्यामुळे माणसाने आपला स्वभाव नेहमी शांत ठेवला पाहिजे.

ज्ञान मिळवण्याची इच्छा – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती सतत काही न काही नवीन शिकण्याच्या भूमिकेमध्ये असतो, तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो.

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाकुंभ फेम 32 वर्षांची मॉडेल हर्षा हीने केले स्वत:चे पिंडदान, धारण केले नवे नाव..
  • नवरीच्या नाकावर कुंकू सांडणं शुभ असतं की मोठ्या संकटाची चाहूल; वाचा नेमके काय संकेत मिळतात?
  • GT vs MI : बुमराह इज बॅक, गुजरातला पहिल्याच बॉलवर झटका, साई सुदर्शन गोल्डन डक, पाहा व्हीडिओ
  • चाणक्य नीतीचा सर्वात गुप्त संदेश, या सवयींकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्य संकटात!
  • Vastu Shastra : पैशांची 3 झाडं, घरात लावल्यास होईल धनाचा वर्षाव, कर्जातून मिळते झटपट मुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in