• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! आता थेट रशियावर भीषण हल्ला, रिफायनरी उडवल्या, सैन्य तळांवरही हल्ले, जग हादरलं

April 20, 2026 by admin Leave a Comment


स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमेरिका देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तळ ठेकून बसली आहे. अमेरिकेनं ईराणचं एक व्यापारी जहाजं आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता वातावरण अजूनच तापलं आहे. अमेरिकेनं इराणचं जहाज ताब्यात घेताच इराण अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळतं आहे. आम्ही बदला घेऊ असा थेट इशाराच इराणने अमेरिकेला दिला आहे. सर्व जगाचं लक्ष सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूजवर लागलेलं असतानाच आता दुसरीकडे रशियावर भीषण हल्ला झाला आहे.

युक्रेनने रशियावर ड्रोन्स आणि मिसाइलने भीषण हल्ला केला आहे. काळ्या समुद्राच्या जवळ असलेल्या रशियाच्या सैन्य तळांवर युक्रेनकडून हल्ला करण्यात आला आहे. याबाबत युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. आम्ही रशियाच्या अनेक सैन्य तळांवर हल्ला केल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही रशियाच्या जहाजांवर देखील हल्ला केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. दरम्यान युक्रेनने जहाजांवर हल्ला केल्याचा वृत्ताला अद्याप रशियाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

मात्र युक्रेनने तेल डेपो आणि रिफायनरींवर हल्ला केल्याचं रशियानं मान्य केलं आहे. युक्रेनने रशियाच्या ज्या रिफायनरीवर हल्ला केला आहे, त्या रिफायनरीमधून रशिया दिवसाला तब्बल 2,40000 बॅरल क्रूड ऑईल प्रोड्यूस करतो. हा रशियावर झालेला सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आली आहे. दरम्यान एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्धविराम संपण्यासाठी अवघे काही तास बाकी असतानाच पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये वातावरण तापलं आहे. जर स्थिती अशी राहील तर जगात तिसरं महायुद्ध देखील होऊ शकतं अशी परिस्थिती आहे, त्यातच आता पुन्हा एकदा युक्रेनवर रशियानं हल्ला केला आहे. यामुळे पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाकुंभ फेम 32 वर्षांची मॉडेल हर्षा हीने केले स्वत:चे पिंडदान, धारण केले नवे नाव..
  • नवरीच्या नाकावर कुंकू सांडणं शुभ असतं की मोठ्या संकटाची चाहूल; वाचा नेमके काय संकेत मिळतात?
  • GT vs MI : बुमराह इज बॅक, गुजरातला पहिल्याच बॉलवर झटका, साई सुदर्शन गोल्डन डक, पाहा व्हीडिओ
  • चाणक्य नीतीचा सर्वात गुप्त संदेश, या सवयींकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्य संकटात!
  • Vastu Shastra : पैशांची 3 झाडं, घरात लावल्यास होईल धनाचा वर्षाव, कर्जातून मिळते झटपट मुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in