• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही डाळ चक्क ‘नॉन व्हेज’ मानली जाते, प्रसादातही समावेश आहे वर्ज्य..

April 20, 2026 by admin Leave a Comment


डाळ ही भारतीय जेवणाच्या थाळीतील अभिन्न हिस्सा आहे. शाकाहारी कुटुंबासाठी डाळ ही प्रोटीनचा प्रमुख स्रोत मानली जाते. परंतू तुम्हाला माहिती आहे का एक अशी डाळ आहे जिला अनेक हिंदू परिवार खास करुन ब्राह्मण आणि वैष्णव सुमदाय नॉन – व्हेज आहे म्हणून नाक मुरडतात. होय हे खरे आहे लाल मसूरीच्या डाळीला (Red Lentils) तामसी भोजन मानले जाते. अनेक मंदिरात या डाळीला प्रसादात देखील सामील केले जात नाही. साधु-संत आणि काही परंपरामध्ये या डाळीला खाण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही सर्वसामान्य लोक हीला आवडीने खातात. या लाल मसुर डाळीत अखेर असे काय आहे. जाणून घेऊया संपूर्ण कहाणी…

हिंदू धर्मात भोजनला तीन श्रेणीत विभागले आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक.सात्विक भोजन शांत आणि आध्यात्मिक उन्नती वाढवते. तर तामसिक भोजन सुस्ती, राग आणि नकारात्मक भावनांना वाढवते. लाल मसूरीला तामसिक मानले जाते. आयुर्वेदानुसार ही डाळ शरीराला उष्णता आणि उत्तेजना देते, जे ध्यान आणि साधना करणाऱ्यासाठी उपयुक्त नाही. सर्वाधिक प्रसिद्ध पौराणिक कथा कामधेनु गायीशी संबंधित आहे.

कथेनुसार जमदग्नी ऋषी यांच्याकडे कामधेनु नावाची गाय होती. सहस्त्रार्जुन (कार्तवीर्य अर्जुन) ने या गायीला चोरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही गाय जखमी झाली आणि जिथे तिचे रक्त पडले तेथे मसुर डाळीची रोपटी उगवली. कामधेनु पवित्र मानली जात असली तर तिच्या रक्ताने उत्पन्न डाळीला अशुद्ध वा मासांहारीच्या समकक्ष मानले गेले. काही कथांमध्ये यास राक्षसाच्या रक्ताशी जोडले जाते. या कारणाने ब्राह्मण, साधु- संत आणि वैष्णवी परंपरेचे अनुयायी मसुर डाळीशी फारकत घेत आहेत. अनेक मंदिरात यास प्रसादात या डाळीचा वापर करत नाहीत. खास करुन काली पूजा वा तांत्रिक अनुष्ठानात यास अर्पण केले जाते. मात्र, सात्विक मंदिरात या डाळीला मनाई केली जाते. बंगाली ब्राह्मण समुदायात तर या डाळीला कांदा,लसून सारखे नॉन-व्हेज मानले जाते. एकादशी गुरुवारी या सणात या डाळीला बिल्कुल खाल्ले जात नाही.

प्रोटीनचे प्रमाण हेच एक कारण

मसूरच्या डाळीत प्रोटीनचे खूप जास्त असते. जवळपास मांसाप्रमाणे ते असते. शाकाहारी भोजनात हा एक चांगला पर्याय आहे. परंतू काही समुदायात यास मांसासारखे मानून टाळले जात आहे. आधीतर विधवांना देखील ही डाळ खाण्यास मनाई होती. कारण यात प्रोटीन जास्त असल्याने उत्तेजना वाढू शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चाणक्य नीतीचा सर्वात गुप्त संदेश, या सवयींकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्य संकटात!
  • Vastu Shastra : पैशांची 3 झाडं, घरात लावल्यास होईल धनाचा वर्षाव, कर्जातून मिळते झटपट मुक्ती
  • पीएम मोदी यांनी झालमुडीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज
  • अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज
  • मोठी बातमी! आता थेट रशियावर भीषण हल्ला, रिफायनरी उडवल्या, सैन्य तळांवरही हल्ले, जग हादरलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in