• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पीएम मोदी यांनी झालमुडीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज

April 20, 2026 by admin Leave a Comment


PM Modi Jhalmuri Video Viral: पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूक प्रचारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताफा थांबवून रस्त्यावरील ठेल्यावर झालमुडीचा स्वाद घेतल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ही घटना पीएम मोदी यांच्या झारग्राममध्ये एका पब्लिक रॅलीत संबोधित केल्यानंतर काही वेळानंतर घडली. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरमध्ये सवार होण्यासाठी जात होते. तेव्हा अचानक त्यांनी वळून रस्त्याकडील दुकानात झालमुडीचा ( भेळीचा प्रकार ) आस्वाद घेतला. हा व्हिडीओ पीएम मोदी यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला गेला. इंस्टाग्रामवरुन वेगाने व्हायरल झालेल्या या व्हिडीओला २४ तासाच्या आत १०० मिलियन ( १० कोटी ) व्ह्यूज मिळाले. तर फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओला ९१ मिलियन ( सुमारे ९.१ कोटी ) व्यूज मिळाले.

पीएम मोदी यांनी दुकानदाराशी साधला संवाद

वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत पीएम मोदी दुकानदाराच्या जवळ जातात आणि त्याला म्हणतात मला झालमुडी खायला देशील? मोदी दुकानदाराला विचारात किती रुपयांना तुमची झालमुडी आहे. यानंतर मोदी पुढचा प्रश्न विचारतात चांगला वाला कितीला आहे ?

या प्रश्नाचे उत्तर देताना दुकानदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो की १० रुपये, २० रुपये आणि ३० रुपये. दुकानदार पीएम मोदींना विचारतात तुम्ही कांदा खाता का ? या प्रश्नावर मोदी मिश्कीलपणे उत्तर देतात हा कांदा खातो, डोकं खात नाही..

येथे व्हिडीओ पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

कोण आहेत दुकानदार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दुकानावर थांबले होते. ते दुकान मूळच्या बिहारच्या राहणाऱ्या विक्रम साह यांचे आहे. ते गेल्या १२ वर्षांपासून झारग्राममध्ये झालमुडीचे दुकान चालवत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा ताफा अचानक थांबणे दुकानदार आणि पाहणाऱ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रचार रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुडीचा आनंद घेतला. झालमुडी म्हणजे मुरमुरे किंवा कुरमुरे, हिरवी मिरची आणि दुसरे मसाले टाकून तयार केलेली एक पॉप्युलर बंगाली स्ट्रीट फूड आहे.सूत्रांनी सांगितले की झालमुडीसाठी गुगल सर्च ट्रॅफीक २२ वर्षात सर्वाधिक आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! इराण पुन्हा पेटणार? नेतान्याहू संतापले… चर्चा फिस्कटल्यास भयंकर घडणार
  • IPL 2026, SRH vs DC: सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपटिल्स आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • बुमराहच्या अपयशाला कॅप्टन हार्दिक जबाबदार, चूक सुधारताच यॉर्कर किंगला सूर गवसला, काय झालं?
  • महाकुंभ फेम 32 वर्षांची मॉडेल हर्षा हीने केले स्वत:चे पिंडदान, धारण केले नवे नाव..
  • नवरीच्या नाकावर कुंकू सांडणं शुभ असतं की मोठ्या संकटाची चाहूल; वाचा नेमके काय संकेत मिळतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in