• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! इराण पुन्हा पेटणार? नेतान्याहू संतापले… चर्चा फिस्कटल्यास भयंकर घडणार

April 20, 2026 by admin Leave a Comment


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. इराणविरुद्धचे इस्रायलचे लष्करी अभियान अद्याप पूर्ण झालेले नाही असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. यापूर्वी अमेरिकन प्रशासनाच्या अधिकृत द व्हाईट हाऊस अकाउंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक महत्त्वाची पोस्ट केली होती. यात इराणविरुद्ध कडक भूमिका घेत संकेत देण्यात आले होते. आता कोणतेही कारण चालणार नाही आणि विजय मिळेपर्यंत अमेरिका थांबणार नाही असं अमेरिकेने म्हटले होते. त्यानंतर आता इस्रायलनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता मध्यपूर्वेत पुन्हा मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्लामाबादमधील चर्चा निष्फळ ठरल्यास इराणसोबत पुन्हा युद्ध होऊ शकते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लष्करी अभियान अजून संपलेले नाही

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट संकेत दिले की इराणविरुद्धचे इस्रायलचे लष्करी अभियान अजून संपलेले नाही. अजून बरेच काम बाकी आहे असे नेतन्याहू यांनी म्हटले. 11 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी हिब्रू भाषेत म्हटले होते की, हे अभियान अद्याप सुरू आहे आणि आम्ही ऐतिहासिक यश मिळवले आहे. नेतन्याहू यांनी दावा केला की इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी क्षेपणास्त्र उत्पादन आणि अणु कार्यक्रम जमिनीखाली खोलवर लपवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. इराणकडे अजूनही 400 किलोपेक्षा अधिक संवर्धित युरेनियम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संभाव्य कारवाईची तयारी

इस्रायली पंतप्रधानांच्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे संरक्षण विभाग इराणविरुद्ध विविध संभाव्य परिस्थितींसाठी तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. चर्चा अपयशी ठरल्यास प्रथम हल्ल्याचाही पर्याय विचारात असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, इराणनेही तेहरानवर अचानक हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता नाकारला येत नाही. असे झाल्यास संपूर्ण जगाच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक देश अडचणीत सापडू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पालकांच्या निधनानंतर त्यांचा TDS रिफंड कसा मिळवायचा? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
  • GT vs MI: सूर्यकुमार यादव वेगवान चेंडूचा ठरला बळी, रबाडाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पडताच उडवल्या दांड्या
  • कार खरेदीची सुवर्णसंधी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त कार लोन
  • Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष… पीडितांना छळणाऱ्या आठवणी अजूनही ताज्या
  • कमी EMI चा मोह टाळा! दीर्घमुदतीच्या कर्जावर भरावे लागेल दुप्पट व्याज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in