• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष… पीडितांना छळणाऱ्या आठवणी अजूनही ताज्या

April 20, 2026 by admin Leave a Comment


पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. लष्कर ए तोयेबाशी संबंधित ‘द रेसिस्टन्स फ्रंट (TRF)’ या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. धार्मिक ओळखीच्या आधारावर पर्यटकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. धर्म विचारून कुटुंबीयांच्या समोरच जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात 25 पर्यटक आणि एक स्थानिक नागरिक ठार झाले. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) करत आहे. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे, तर मदत करणाऱ्यांना अटक करून चौकशी सुरू आहे.

पहलगामजवळील बैसारन मैदानात झालेल्या या हल्ल्याला 22 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष उलटूनही या घटनेच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. वाचलेले लोक आणि त्यांच्या कुटुंबीयांना अजूनही तीव्र मानसिक आघात सहन करावा लागत आहे. आपल्या डोळ्यासमोर पती, मुलगा किंवा कुटुंबीयांना गमावलेल्या कुटुंबांचे दु:ख आजही कमी झालेले नाही.

न पुसणाऱ्या आठवणी

अनेक कुटुंबांसाठी हा आघात वारंवार आठवतो. या हल्लाची अपडेच जेव्हा सरकारकडून दिली जाते किंवा सोशल मीडियावर याबाबत माहिती समोर येते तेव्हा त्या भीषण घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचीही आठवण त्यांना येते. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळले असले तरी त्यांचे दु:ख अजूनही तितकेच तीव्र आहे, असे पीडित कुटुंबीय सांगतात.

न्यायासाठी संघर्ष

कानपूरमधील व्यावसायिक शुभम द्विवेदी यांच्या पत्नी आयशान्य यांनी आपल्या डोळ्यासमोर पतीची हत्या होताना पाहिली. लग्नाला अवघे दोन महिने झाले होते. त्या स्वतःलाही ठार मारण्याची विनंती करत होत्या, पण दहशतवाद्यांनी ऐकले नाही. आज त्या आपल्या सासरच्यांसोबत राहत असून, शुभमची आठवण न येणारा एकही दिवस नाही, असे त्या सांगतात. त्यांना सरकारी नोकरी आणि पीडितांना शहीद दर्जा मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.

शांततेत दु:ख व्यक्त करणारी कुटुंबे

जयपूरमध्ये नीरज उध्वानी यांच्या कुटुंबाने मूकपणे दु:ख व्यक्त करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ते या घटनेबद्दल बोलण्यापेक्षा प्रार्थना करून त्यांची आढवण करतात. गुजरातमधील भावनगर येथे परमार कुटुंबाने यतेश परमार आणि त्यांचा 16 वर्षांचा मुलगा सुमित यांना गमावले. या घटनेमुळे त्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. कुटुंब आता अधिक सावधपणे जीवन जगत आहे.

कुटुंबांवर परिणाम

बेंगळुरूमध्ये भारत भूषण यांच्या कुटुंबावर या घटनेचा खोल परिणाम झाला आहे. त्यांच्या पत्नी सुजाता या अजूनही त्या घटनेच्या आठवणीतून बाहेर पडू शकलेल्या नाहीत. कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देत जीवन पुढे नेत आहेत. इंदूरमध्ये जेनिफर या आपल्या पती सुशील नथानियल यांच्या मृत्यूच्या आठवणीतून बाहेर पडू शकलेल्या नाहीत. हल्ल्याच्या वेळी पतीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आजही त्या मानसिक धक्क्यातून सावरू शकलेल्या नाहीत. त्यांचा मुलगा ऑस्टेन कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे. शेजारी आणि समाजाकडून काही प्रमाणात मदत मिळाली असली तरी अधिकृत मदत मर्यादितच राहिली आहे, असे कुटुंबीय सांगतात.

जखमा अजूनही जिवंत

देशभरातील विविध शहरांमध्ये असलेल्या पीडित कुटुंबांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. कोणी शांततेत दु:ख सहन करत आहे, तर कोणी न्यायासाठी लढत आहे. हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे, पहलगाममधील हिरवीगार दरी पुन्हा शांत झाली असली, तरी त्या घटनेतील जिवंत राहिलेल्यांच्या मनातील जखमा अजूनही भरून निघालेल्या नाहीत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पालकांच्या निधनानंतर त्यांचा TDS रिफंड कसा मिळवायचा? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
  • US, Iran conflict : असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना चांगलंच सुनावलं; म्हणाले …तर इराणसोबत चर्चाच होणार नाही
  • पालकांच्या निधनानंतर त्यांचा TDS रिफंड कसा मिळवायचा? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
  • GT vs MI: सूर्यकुमार यादव वेगवान चेंडूचा ठरला बळी, रबाडाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पडताच उडवल्या दांड्या
  • कार खरेदीची सुवर्णसंधी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त कार लोन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in