
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबादचं होमग्राउंड असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेतीन सामन्यात विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने 6 पैकी 3, तर चेन्नई सुपर किंग्सने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. दोघांच्या खात्यात प्रत्येकी 6 गुण आहेत, पण गुणतालिकेत नेट रन रेटमुळे त्यांच्यात फरक आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ चौथ्या, तर दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून दिल्ली कॅपिटल्सला अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळेल. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघाची कामगिरी
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हेड टू हेडचा रेकॉर्ड बरोबरीचा आहे. या दोन संघांमधील 26 सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादने 13, तर दिल्ली कॅपिटल्सने 12 सामने जिंकले आहेत. या दोन संघांमधील एक सामना अनिर्णित राहिला. मागच्या पर्वात दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते. यात एक सामना दिल्ली कॅपिटल्ने 7 विकेटने जिंकला. तर एक सामना झालाच नाही. हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सची सर्वोच्च सांघिक धावसंख्या 207, तर त्यांची सर्वात कमी धावसंख्या 80 आहे. दुसरीकडे, हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 266 सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे, तर या सामन्यातील त्यांची सर्वात कमी धावसंख्या 116 आहे.
कसं असेल हवामान?
एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी हैदराबादच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासाठी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. दुपारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र, संध्याकाळी हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संपूर्ण सामना होईल. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी पारंपरिकरित्या फलंदाजांना अनुकूल असेल. या मैदानात मागच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 194 धावांचा बचाव चांगल्या प्रकारे केला होता.
Leave a Reply