• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Urmila Matondkar : दिग्दर्शकाच्या बायकोने कानशिलात लगावताच उद्ध्वस्त झालं उर्मिलाचं आयुष्य, पूर्व पतीने थाटला दुसरा संसार

June 17, 2026 by admin Leave a Comment


Urmila Matondkar : बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अनेक चर्चेत आली आहे. नुकताच उर्मिला हिच्या पूर्व पतीने दुसरं लग्न केलं. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. मोहसिन अख्तर मीर याने दुसरं लग्न केल्यानंतर उर्मिला हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एक काळ असा होता जेव्हा उर्मिला हिच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागलेली असायची. पण उर्मिला हिने सर्वांसोबत काम करण्यास नकार दिला. अखेर याची मोठी किंमत अभिनेत्रीला मोजवी लागली…

बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना उर्मिला हिचं नाव दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्यासोबत जोडलं जात होतं. पण दोघांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सांगायचं झालं तर, दोघांच्या नात्याची सुरुवात, ‘द्रोही’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. वर्मा यांनी अभिनेत्रीचा डान्स पाहिला आणि तिच्या प्रेमात पडले. अखेर ‘रंगीला’ सिनेमासाठी दिग्दर्शकाने उर्मिला हिची निवड केली. रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये उर्मिला हिला संधी दिल्या. तेव्हा अन्य दिग्दर्शकांसोबत काम करण्यास अभिनेत्री सतत नकार देत होती…

पण दोघांच्या नात्यात मोठा ट्विस्ट आला, जेव्हा राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला सर्वकाही कळलं. उर्मिला हिच्यासोबत नवऱ्याचे प्रेमसंबंध आहेत कळताच त्यांच्या पत्नीने अभिनेत्रच्या कानशिलात लगावली आणि रामगोपाल वर्मा यांना घटस्फोट दिला. त्यानंतर रामगोपल वर्मा आणि उर्मिला यांच्या नात्याला देखील तडा गेली.

राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमात उर्मिला हिला काम मिळणं देखील बंद झालं. अशात दुसऱ्या कोणत्या दिग्दर्शकाने उर्मिला हिच्यासोबत काम करण्यास पुढाकार घेतला नाही. कारण प्रसिद्धीझोतात असताना अभिनेत्रीने सर्व दिग्दर्शकांना नकार दिलेला. अशात उर्मिला हिची लोकप्रियता कमी होऊ लागली..
अखेर उर्मिला हिने मोहसिन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केलं. वयाच्या 42 व्या वर्षी उर्मिला हिने लग्न केलं होतं.पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी मोहसिन याने दुसरं लग्न केलं आणि उर्मिला आज एकटीच आयुष्य जगत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in