• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Taarak Mehta : ‘तारक मेहता..’मध्ये मोठा बदल, नव्या अभिनेत्यामुळे जेठालालचं मोठं नुकसान?

July 13, 2026 by admin Leave a Comment


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र जेठालालची भूमिका विशेष प्रसिद्ध आहे. अभिनेते दिलीप जोशी गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेत ही भूमिका साकारत आहेत. विनोदाची अचूक टायमिंग, त्यांचे हावभाव, डायलॉग बोलण्याची पद्धत.. याबाबतीत ते मोठमोठ्या कलाकारांनाही मागे टाकतात. म्हणूनच ‘जेठालाल’ म्हणून त्यांना फक्त भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मात्र आता जेठालालच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काळात निर्माते मालिकेतील जेठालालचा ट्रॅक कमी करण्याचा विचार करत आहेत.

‘तारक मेहता..’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच एक नवीन कुटुंब आलं आहे. हे राजस्थानी कुटुंब असून त्यात चार सदस्य आहेत. पती, पत्नी आणि दोन मुलं. अभिनेते कुलदिप गौर या मालिकेत रतन सिंह बिंजोलाची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेत्री धरती भट्ट ही रतनची पत्नी रुपाच्या भूमिकेत आहे. या दोघांना वीर हा मुलगा आणि बंसरी ही मुलगी आहे. आता निर्माते या कुटुंबाच्या कथेवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं कळतंय.

मालिकेत नव्या अभिनेत्याची एण्ट्री-

 

View this post on Instagram

 

A post shared by Kuldeep Gor (@cooldeepg)

जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे महिन्यातून पंधरा दिवस शूटिंग करतात आणि सर्वाधिक मानधनसुद्धा घेतात. त्यामुळे निर्माते रतन सिंह बिंजोलाच्या कुटुंबावर जास्त फोकत ठेवून कथा दाखवण्याचा प्लॅन करत आहेत. जेव्हापासून मालिकेत हे नवीन कुटुंब आलं आहे, तेव्हापासून निर्माते सर्वाधिक कथा त्यांचीच दाखवत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मालिकेत जेठालालचा ट्रॅक दाखवण्यातच आला नाहीये. आधी काही दिवस बाघा आणि बावरीच्या प्रेमकथेवरचा ट्रॅक पहायला मिळत होता. तेव्हासुद्धा जेठालाल मालिकेत कमीच दिसले.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15-16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जेठालाल हे या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय पात्र आहे. या पात्राबद्दल काही विशेष निर्णय घेण्यात आला का, याविषयी अद्याप निर्मात्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तर अभिनेते दिलीप जोशीसुद्धा याबद्दल व्यक्त झाले नाहीत. त्यामुळे येत्या काळात या मालिकेत नेमके कोणते बदल होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in