• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

August 26, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर(Sharddha Kapoor) तिच्या साध्या स्वभावामुळे आणि मिश्कील अंदाजामुळे चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील खास क्षण तिच्या चाहत्यांसोबत बरेचदा शेअर करत असते. कधी कुटुंबासोबतचे फोटो, तर कधी प्रवासातील आठवणी ती सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. यावेळी श्रद्धाने चक्क आपल्या मुंबई शहराचीच सफर एका पर्यटकाप्रमाणे केली. श्पद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती कारमध्ये बसून सेल्फी घेताना दिसली, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये निवांत बसलेली दिसते. आणखी एका फोटोमध्ये विविध चविष्ट पदार्थांनी सजलेले टेबल तिच्या फोटोत पहायला मिळालं. तिचा हा बिनधास्त अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.

कधी स्वतःच्या शहरात पर्यटक बनलात का?

एवढंच नव्हे तर श्रद्धाने कारमधून मुंबईचे दोन व्हिडिओही शूट केले. पहिल्या व्हिडिओमध्ये मुंबईचा हायवे, रुंद रस्ते आणि आजूबाजूच्या उंच इमारती दिसतात. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला भरलेला कपड्यांचा बाजार आणि खरेदीसाठी जमलेली गर्दी पाहायला दिसून येते. “कधी स्वतःच्या शहरात पर्यटक बनला आहात का?” अशी मजेशीर कॅप्शन देत श्रद्धाने तिच्या चाहत्यांना हा प्रश्न विचारलाय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

‘तीन पत्ती’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत पण तितकीच गोड आणि साधी अभिनेत्री असलेल्या श्रद्धा कपूरने 2010 मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, 2013 मध्ये आलेल्या ‘आशिकी 2’ या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. या चित्रपटात तिने आरोहीची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली. आदित्या कपूर आणि तिची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली.

त्यानंतर श्र्दाने मागे वळून पाहिलंच नाही. ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘एबीसीडी 2’, ‘बागी’, ‘रॉक ऑन 2’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘स्त्री’ यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट तिने केले. ‘स्त्री’मधील तिच्या रहस्यमय भूमिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

त्यानंतर ती ‘साहो’, ‘छिछोरे’, ‘बागी 3’ आणि ‘तू झूठी मैं मक्कार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. ‘स्त्री 2’च्या दमदार यशानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी मोठी भर पडली. आता तिच्या आगामी इठा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पहात आहेत.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in