• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Swara Bhasker: स्वरा भास्करची जीभ छाटणाऱ्याला 1.51 लाखांचं बक्षीस; ‘जौहर’च्या वक्तव्यावरून संतापाचा उद्रेक

September 3, 2026 by admin Leave a Comment


Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘जौहर’च्या चित्रणावर केलेल्या वक्तव्यामुळे स्वराच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद आता आग्र्यातही उमटले असून, आंदोलकांनी स्वराच्या पोस्टरला आग लावून निषेध केला. इतकंच नाही तर एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने स्वराची जीभ कापणाऱ्याला 1.51 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली. या वादाची सुरुवात 31 ऑगस्ट 2026 रोजी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमातून झाली. या कार्यक्रमात स्वरा यांनी ‘पद्मावत’मधील जौहरच्या प्रसंगावर तिचं मत व्यक्त केलं होतं. जौहरला ‘सन्मान’ किंवा ‘गौरव’ म्हणून दाखवण्याचा आजच्या समाजावर आणि विशेषतः महिलांवर काय परिणाम होऊ शकतो, असा सवाल तिने उपस्थित केला.

आग्र्यात आंदोलन, पोस्टर जाळले

स्वराच्या वक्तव्यावर आक्षेप घेत योगी यूथ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आग्र्यात आंदोलन केलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कुंवर अजय तोमर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात स्वराचे पोस्टर जाळण्यात आले. आंदोलकांनी स्वराने राजपूत महिला आणि त्यांच्या त्यागाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. या आंदोलनादरम्यान अजय तोमर यांनी स्वराची जीभ कापणाऱ्याला 1.51 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली. या वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळला आहे.

यूपी : आगरा में योगी यूथ ब्रिगेड ने पोस्टर जलाते हुए स्वरा भास्कर की जुबान काटने वाले को 1 लाख रुपए इनाम देने की घोषणा की है। अजय तोमर ने स्वरा भास्कर को वैश्या बताया।@madanmohansoni pic.twitter.com/tNJtZlemEr

— Sachin Gupta (@Sachingupta) September 2, 2026

जौहरला सन्मान किंवा अभिमानाचं प्रतीक म्हणून चित्रित करण्याच्या परिणामावर स्वराने प्रश्न उपस्थित केला होता. अशा चित्रणामुळे बलात्कार पीडितांना एक अस्वस्थ करणारा संदेश जाऊ शकतो, असा युक्तिवाद तिने केला. तसंच स्त्रीच्या पवित्रतेला तिच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं पाहिजे का, असा प्रश्नही तिने उपस्थि केला. वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर स्वरा भास्करने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं. तिने राणी पद्मावती किंवा जौहर करणाऱ्या महिलांना ‘भ्याड’ म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं. तिचा आक्षेप हा इतिहासातील घटनांचं आजच्या काळात होणारं चित्रण आणि त्यातून महिलांबाबत जाणारा संदेश यावर असल्याचं तिने सांगितलं.

या मुद्द्यावरून स्वरा भास्कर आणि शिवसेना (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यात सोशल मीडियावर वाद सुरू झाला. तर राजस्थानमधील करणी सेनेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा किर्ती राठोड यांनी स्वराच्या वादग्रस्त वक्तव्यावरून जोरदार टीका केली. भाजपचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही स्वराला लक्ष्य केलं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kareena Kapoor Khan : आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणार करीनाचा लेक? मोठा होऊन तैमूर..
  • 5000 ची बचत तुम्हाला करेल लखपती, एसआयपी बेस्ट की आरडी ?
  • Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
  • मॅच गाजवली, 6 विकेट्स घेतल्या… पण आता 2 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही; बीसीसीआयने असं पकडलं खोटं!
  • लग्नाच्या पंगतीसाठी परवानगी लागणार? केटरर्सला अगोदरच द्यावी लागणार माहिती… तुकाराम मुंढेंचा नवा नियम काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in