• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मॅच गाजवली, 6 विकेट्स घेतल्या… पण आता 2 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही; बीसीसीआयने असं पकडलं खोटं!

September 3, 2026 by admin Leave a Comment


भारताचा अंडर 19 संघ श्रीलंका दौऱ्यावर ऑगस्ट 2026 मध्ये गेला होता. या संघात फिरकीपटू रोहित यादवही होता आणि कोलंबोत युथ टेस्ट खेळला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या याच कामगिरीमुळे भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 211 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात रोहित यादवच्या कामगिरीचं कौतुक झालं होतं. कारण दोन्ही डावात त्याने महत्त्वाच्या 6 विकेट काढल्या होत्या. पण आता त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली गेली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी बीसीसीआयने ही कारवाई केली आहे. रिपोर्टनुसार, आपलं वय कमी करण्यासाठी त्याने बनावट आधारकार्ड तयार केलं होतं. यात त्याने वय आणि जन्मस्थान अनेकदा बदलल्याचं समोर आलं आहे. बीसीसीआयने या प्रकरणी तपास केला आणि त्यात दोषी आढळला.

रोहित यादवला कसं पकडलं?

मागच्या वर्षी त्याच्या जन्मतारखेत बरेच बदल केल्याचं दिसून आलं. रोहित यादवने 2014 मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं. तेव्हा त्याने जन्म तारीख 7 जुलै 2007 नोंदवली होती. तसेच उत्तर प्रदेशचा पत्ता नोंदवला होता. 2017 मध्ये त्याने आधार कार्ड अपडेट केलं आणि जन्म वर्ष बदलून 2006 केलं. 2020 मध्ये आणखी काही अपडेट केले, पण जन्म वर्षे 2006चं होतं. 2021 मध्ये त्याने जन्म वर्ष पुन्हा बदललं आणि 2009 केलं. यावेळी त्याने पत्ता बदलला आणि उत्तर प्रदेश ऐवजी पश्चिम बंगालमधील हावडा केला. त्यानंतर रेकॉर्डमध्ये लिलुआह नोंद केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पत्ता कट

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड केली होती. पण तपासात त्याचा बनाव उघड झाल्याने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली गेली आहे. अंडर 19 वयोगटात खेळण्यासाठी त्याने ही फसवणूक केली होती. या कारवाईनंतर ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघात रोहित यादवच्या जागी दुसरा खेळाडू निवडला जाणार आहे. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंवर वयाचा बनाव केल्याप्ररकणी कारवाई केली. यात भारताला अंडर 19 वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या मनजोत कालरा याचंही नाव आहे. यासह प्रिन्स यादव, नितीश राणा याच्यावरही कारवाई झाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले
  • मराठ्यांनो अर्ज करा, आडनाव सेम असेल तर… शिष्टमंडळ भेटताच जरांगेंचा थेट आदेश, ती मागणी मान्य
  • Bigg Boss house : साप, विंचू, माकड, बिग बॉसच्या घराची थक्क करणारी थिम; फोटो आले समोर!
  • Shortness of breath : पायऱ्या चढताच लागतोय दम, फिटनेसची कमी की अजून काही ? हे कशाचे संकेत
  • आता नवा मंत्री अभिजीत दिपकेच्या टार्गेटवर, आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच नवा प्लान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in