
जर दर महिन्याला पगारातून केवळ ५,००० रुपये वेगळे काढले तर काही काळानंतर बचत वाढून एक लाख रुपयांचा फंड होऊ शकतो. यासाठी कोणतीही मोठी रक्कम इन्वेस्टमेंट सुरु करणे गरजेचे नाही. छोटी बचतीतून दर महिन्याला इन्वेस्टमेंट करण्याच्या सवयीने हळूहळू मोठा फंड तयार होऊ शकतो. आता प्रश्न हा आहे की ५,००० रुपयांची बचत १ लाख रुपयांपर्यंत पोहचण्यासाठी अखेर किती महिने लागू शकतात. यासाठी ‘एसआयपी’ चांगली आहे ‘पोस्ट ऑफीस’ची आरडी पाहूयात…
म्युच्युअल फंडाची एसआयपी त्या लोकांसाठी चांगली आहे जे दर महिन्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्टमेंट करु इच्छीतात. जर तुम्ही दर महिन्याला ५,००० रुपयांची एसआयपी कराल तर १८ महिन्यात तुमच्याकडे ९०,००० रुपये जमतील.
जर वर्षाचे १२ टक्के रिटर्न मानून चालला तर सुमारे १८ महिन्यात ही रक्कम सुमारे ९८,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. अशात १ लाख रुपयांचा आकडा सुमारे १९ महिन्यांच्या आसपास पार होऊ शकतो. १.७ वर्षांत ९५,००० रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटवर सुमारे ९,०५४ रुपये रिटर्न मिळू शकते आणि एकूण रक्कम सुमारे १.०४ लाख रुपये होऊ शकते.
500 रुपये जास्त लावल्याने फायदा
जर तुम्ही हे टार्गेट थोडे लवकर मिळवू इच्छिता तर जोखीम वाढवण्याच्या ऐवजी दर महिन्याची इन्व्हेस्टमेंटची रक्कम वाढवणे एक सोपी पद्धत होऊ शकते. उदा. ५,००० च्या जागी तुम्ही ५,५०० रुपये महिना बचत करुन एक लाखाच्या टार्गेटपर्यंत पोहचू शकता.
परंतू हे लक्षात घ्या म्युच्युअल फंड एसआयपी बाजाराशी संबंधित असते. यामुळे याचा १२ टक्के रिटर्न केवळ एक अंदाज आहे. याची गॅरंटी नाही.
बाजाराची जोखीम नको तर RD
जर तुम्हाला बाजाराच्या चढउताराची जोखीम नको असेल तर पोस्ट ऑफीसच्या आरडीचा देखील विचार करु शकता. यात दर महिन्याला फिक्स रक्कम जमा करायची असते. आणि योजनेनुसार लागू व्याजदराच्या हिशेबाने रक्कम वाढते.
६.४५ टक्के वार्षिक व्याजाचा दर मानल्यानंतर ५,००० रुपये महिने जमा केल्याने सुमारे २१ महिन्यात १ लाख रुपयांचे टार्गेटपर्यंत पोहचू शकते. मॅच्युरिटीनंतर रक्कम १,११,४०६ रुपये आणि एकूण व्याज ६,४०६ रुपये होऊ शकते.
आरडीमध्ये रिटर्न जास्त अंदाजित असतो. जर एसआयपीमध्ये परतावा बाजारातील जोखीमेवर डिपेंड असतो. यामुळे एसआयपीमध्ये जास्त कमाईची शक्यता असली तर जोखीम देखील असते.
Leave a Reply