• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunny Deol : सनी देओलला मुस्लीम दाखवल्यामुळे ‘बंटवारा 1947’ ला मोठा फटका? दिग्दर्शकाने सोडलं मौन

August 31, 2026 by admin Leave a Comment


Sunny Deol : ‘बंटवारा 1947’ सिनेमात अभिनेता सनी देओल, अभिनेत्री प्रिती झिंटा आणि शबाना आझमी यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजकुमार संतोषी यांच्यावर होती. देशभक्तीवर आधारित सिनेमा असल्यामुळे अनेकांना असं वाटलं की, सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल… पण असं काही घडलं नाही. प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी सिनेमाला संमिश्र प्रतिसाद दिला. पण नुकतात शबाना आझमी यांनी सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यावर राजकुमार संतोषी यांनी मौन सोडलं आहे.

‘बंटवारा 1947’ का ठरला फ्लॉप?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राजकुमार संतोषी म्हणाले, ‘मला एक गोष्ट बिलकूल कळत नाही, त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव घेत उदाहारण दिलं. कुली सिनेमात त्यांनी एका मुस्लीम अभिनेत्याची भूमिका साकारली होती. मनमोहन देसाई यांच्या अनेक सिनेमांमध्ये मुस्लीम हिरो होते. आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत का, जिथे आपण एकमेकांच्या समाजातील अभिनेत्यांचा स्वीकारू शकत नाही? आपण समंजस, सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक आहोत. मग या सिनेमात मोठी त्रुटी आहे, असा दावा ते कसा करू शकतात?’

पुढे राजकुमार संतोषी म्हणाले, ‘आजच्या समाजात आपण खूपच कमी सहिष्णू आणि सर्वसमावेशकतेचा अभाव असलेले बनलो आहोत. मला असं वाटतं की, आपण निर्मात्याचा उद्देश आणि लेखकाला पोहोचवायचा असलेला संदेश यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजं. मी हिंदू आहे आणि मंदिरात जातो; माझ्या मुलाचे नाव ‘राम’ आहे. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; उलट, प्रत्येक धर्मातील सकारात्मक गोष्टींचा स्वीकार करण्याची माझी इच्छा आहे. संतांनी धर्माविषयी जे काही सांगितलं आहे, त्या सर्वांचा केंद्रबिंदू नेहमीच ‘समानता’ हा राहिला आहे. हिंदू धर्म हा नेहमीच सर्वसमावेशक राहिला आहे; तो फूट पाडणारा धर्म नाही.’

‘बंटवारा 1947’ च्या अपयशावर काय म्हणाल्या शबाना आझमी?

‘बंटवारा 1947’ सिनेमा अपयशी ठरल्यानंतर शबाना आझमी म्हणाल्या, अभिनेता सनी देओलला मुस्लिम भूमिकेत स्वीकारणं प्रेक्षकांना का कठीण गेलं? ‘कुली’ सारख्या सिनेमात तर, महानायक अमिताभ बच्चन यांनी मुस्लीम भूमिका साकारलेली. 786 लावून द्यायचे आणि प्रेक्षकांनी त्यांचा स्वीकार देखील केला. आता असं वातावरण निर्माण केलं जात आहे की, ज्यात भेदभाव होत आहे, या वस्तुस्थितीचा आपण काय अर्थ लावायचा?, सध्या शबाना आझमी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 10 प्रवासी गंभीर जखमी..
  • Todays Gold Rate: महिन्याचा शेवट गोड, सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमसाठी फक्त आता…आजचा भाव किती?
  • Raj Sharmila Thakeray Love Letters: राज ठाकरे – शर्मिला ठाकरे यांचे लव्हलेटर पोहोचवणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा, लग्नात काय घडलेलं?
  • महिलांनी घरातच राहावे, नाहीतर अनर्थ ओढवेल; इस्लामिक विद्वानाचे वक्तव्य चर्चेत, बुरखा आवश्यक असल्याची मागणी
  • सोसायटीकडून सायकल पार्किंगसाठी 1500000 रुपयांचा दंड; मुंबई हायकोर्टाचा फ्लॅटधारकाला दिलासा, काय आहे प्रकरण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in