• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raj Sharmila Thakeray Love Letters: राज ठाकरे – शर्मिला ठाकरे यांचे लव्हलेटर पोहोचवणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा, लग्नात काय घडलेलं?

August 31, 2026 by admin Leave a Comment


Raj Sharmila Thakeray Love Letters: राजकारणातील आक्रमक, प्रभावी व तडफदार नेतृत्व म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. राजकारणातील त्यांची मोलाची कामगिरी आज प्रत्येकाला माहिती आहे. पण राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कोणाला माहिती आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीचा आणि लग्नाचा खास किस्सा सांगितला आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे लव्हलेटर पोहोचवण्याचं काम मी करायचे… असं वंदना गुप्ते म्हणाल्या.

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे लव्हलेटर्स

जुन्या आठवणी ताज्या करत शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘शर्मिला आणि मी आम्ही दोघींनी मिळून फार धम्माल केली आहे. राज आणि शर्मिला यांना मी फार जवळून पाहिलं आहे. मी दोघांची एकमेकांना प्रेम पत्र पोहोचवली आहेत. ती आमची मैत्री आजपर्यंत टिकून आहे… राज यांना (राज ठाकरे) देखील सर्व गोष्टी माहिती आहे. आता देखील आम्ही शिवाजी पार्क येथे शेजारी राहतो… त्यामुळे सतत भेट होते.’ असं वंगना गुप्ते म्हणाल्या.

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाबद्दल वंदना गुप्ते म्हणाल्या, ‘राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे याच्या लग्नात देखील आम्ही खूप धम्माल केली. राजचा एक मित्र आणि मी मिळून ठेवणे… वेगवेगळ्या ठिकाणी घड्याळ गजर लावून ठेवले. खूप खूप सतावलं होतं. आजही आमचे संबंध चांगले आहेत…’ असं देखील वंदना गुप्ते म्हणाल्या.

वंदना गुप्ते यांच्याबद्दल सांगयचं झालं  तर, त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आंधळी कोशिंबीर, टाईम प्लीज, दिवसेंदिवस, पछाडलेला, बाप रे बाप डोक्याला ताप, बे दुणे साडेचार, मणी मंगळसूत्र, मातीच्या चुली यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये  महत्त्वाची भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. दिलखुलास अभिनेत्री म्हणून देखील त्यांची ओळख आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune | पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांची रणनीती ठरणार?
  • फक्त चिमुटभर मिठ, 5 मिनिटांत बरी होईल डोकेदुखी, जाणून घ्या रामबाण उपाय
  • tv9 Marathi Special Report | मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा; शिंदेंच्या सभेत काळे झेंडे अन् घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
  • Shaktiman: रणवीरकडून 3 तास मनधरणी, ‘शक्तिमान’साठी हातात होता कोट्यवधींचा चेक; तरी मुकेश खन्ना यांनी दिला नकार
  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 10 प्रवासी गंभीर जखमी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in