
भाजप आमदार श्वेता महाले यांना प्रत्युत्तर देताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. बुलढाण्यात बाप तो बाप रहेगा या गाण्यावर ठेका धरत श्वेता महालेंनी धनुष्यबाण चिन्ह दाखवून संजय गायकवाड यांना डिवचल्याची चर्चा आहे.
या घटनेनंतर महालेंना प्रत्युत्तर देताना आमदार गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी लाईट जाण्यासारख्या घटनांना टेक्निकल भाग असे संबोधले आणि आमच्या कार्यक्रमात लाईट अनेक वेळेस जाते असे म्हटले. तसेच, एका बोर्डाच्या वादावर बोलताना, पहिले म्हणले बोर्डाला विरोध केला. ते नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांची ड्युटी आहे. कोणी अवैध बोर्ड लावत असेल तर त्याला विचारलं पाहिजे. ही ड्युटी आहे त्यांची. त्याला कसला राजकारण आलं? असे म्हणत त्यांनी स्वतःचा संबंध नाकारला. त्यांच्या या विधानांनी श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. या प्रकरणी आता राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Leave a Reply