• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक, सरकारकडून..

September 8, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी ते उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे. त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. राज्यात काही भागात मराठा समाज आक्रमक भूमिका घेताना दिसतोय. सोलापूरमध्ये मराठा समाजाकडून महामार्ग अडवण्यात आला. 12 सप्टेंबरला आंतरावली सराटीमध्ये महत्वाची बैठक मराठा समाजाची पार पडेल. त्यानंतर मुंबईकडे मोर्चा निघेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील दिसले. काल रात्री मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा डॉक्टरांचे पथक त्यांची पाहणी करण्यासाठी पोहोचले.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, आम्ही जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, आता कोणतीही चर्चा सरकारकडून त्यांच्यासोबत केली जाणार नाही. आता 12 तारखेच्या जरांगेंच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. यात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

यादरम्यानच छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समितीची बैठक सुरू आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या मराठवाडा दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली असून, सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व इतर अधिकारी उपस्थित असून, बरवड्यातील सगळे जिल्हाधिकारी व्हिडिओकॉन द्वारे या बैठकीला उपस्थित आहेत . कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा नोंदींचा जिल्हानिहाय आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. 10 सप्टेंबरपर्यंत समितीकडून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नागपुरात रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच पोहोचला, असं फुटलं बिंग…
  • रक्ताचं पाणी करून निवडून दिलं, आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि…खासदार ओमराजेंवर दानवे यांची टीका
  • DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता लढ्यासाठी वेगळा मंच, मोठी अपडेट समोर
  • ‘आरक्षणाचं गाजर दाखवून सरकार निवडणुका जिंकतं,’ पण…नाना पटोले यांची टीका
  • सांगलीत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; रात्री झोपेत असतानाच… संतापजनक प्रकार समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in