• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

21 दिवसात 330 वेळा कॉल्स… करोडपती सून नोकराला का करायची फोन? चक्रावणाऱ्या हत्याकांडाचं…

September 8, 2026 by admin Leave a Comment


कानपूरमध्ये एका कोट्यधीश औषध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची हत्या झाली अन् मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तब्बल 21 दिवसांचे फोन कॉल्स खंगाळून काढले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. व्यापारी विनीत यांच्या हत्येपूर्वी त्यांची सून शालू आणि तिचा नवरा सुब्रत घरातील नोकर विशाल गौतमसोबत वारंवार संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. अनेकदा या दोघांनी नोकराशी फोनवर संपर्क केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी काढलेल्या कॉल्स डिटेल्सच्या नुसार, शालूने सुमारे 30 आणि सुब्रतने सुमारे 300 वेळा विशालला कॉल्स केले.

विनीत मनोचा यांच्या हत्येचा पोलीस प्रत्येक अँगलने तपास करत आहे. हा तपास करताना कुटुंबातील लोकांचे फोन कॉल्सही चेक करण्यात आले. त्यात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. विनीत यांच्या हत्येपूर्वी त्यांची सून आणि मुलगा 21 दिवस नोकराशी काय म्हणून फोन करत होते? फोनवर या तिघांचं काय बोलणं होत होतं? पोलिसांनी याबाबत सुब्रत यांची चौकशी केली असता विशाल माझे छोटेमोठे काम करत असतो. त्यामुळे त्याच्याशी वरचेवर फोनवर बोलणं होत असतं, असं सुब्रत यांनी सांगितलं. मात्र, 330 फोन कसे झाले? याचा शोध पोलीस घेत आहेत. केवळ कामकाजाच्या संदर्भात ही चर्चा होती की हत्येच्या तयारीसाठी हा फोन कॉल होत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. या निमित्ताने पोलीस हत्येच्या पॅटर्नचाही शोध घेत आहेत.

सुब्रत म्हणाला…

कॉल डिटेल समोर आल्यानंतर सुब्रत यांची कसून चौकशी करण्यात आली. विशाल पूर्वी आमच्या कुटुंबासोबत काम करत होता. तो माझे छोटेमोठे काम करायचा. त्यामुळेच त्याच्याशी फोनवर बोलणं व्हायचं, असं सुब्रत यांनी म्हटलं आहे. सुब्रत यांचं हे विधान पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पोलीस हा दावा पडताळून पाहत आहे. सामान्य कामासाठी फोन कॉल होत होते तर मग एवढे कॉल करण्याचं कारण काय? असा सवाल पोलिसांना पडला आहे. त्यामुळे ही सामान्य चर्चा होती की हत्येशी संबंधित चर्चा होती याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे पोलीस कॉलची ही संख्या केवळ आकडा म्हणून पाहत नाहीये. तर हत्येशी याचा काही संबंध आहे का? या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

अन् विशालचं नाव आलं…

विनीत मनोचा यांची हत्येनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी या प्रकरणात विशाल गौतम आणि राजकिशोर यांना ताब्यात घेतलं. दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी कथितपणे शालूचं नाव घेतलं. पोलिसांच्या मते, या हत्येच्या योजनेत शालूही होती, असं या दोघांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी शालूला अटक करून तिची कसून चौकशी सुरू केली. त्यातूनच विशाल आणि कुटुंबातील सदस्यांची फोनवर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी गेल्या 21 दिवसांचे कॉल डिटेल्स खंगाळून काढली तेव्हा शालू आणि तिचा नवरा सुब्रत हे दोघेही विशालच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या आरोपानुसार, विनीतच्या हत्येसाठी विशालला सहा लाख रुपयांची सुपारी मिळाली होती. विशालला त्यासाठी दोन लाख रुपये हत्येनंतर चार लाख रुपये 15 दिवसानंतर देण्याचं ठरलं होतं. पोलिसांच्या दाव्यानुसार हत्येसाठी 5 सप्टेंबर ही तारीख फिक्स करण्यात आली होती.

ड्युप्लिकेट चावी बनवली…

पोलिसांना या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. घरातील चावीची ड्युप्लिकेट चावी बनवण्यात आल्याचं पोलीस तपासात आढळून आलं आहे. विशाल हा विनित मनोचा यांचा पूर्वीचा नोकर होता. कुटुंबाशी त्याची जुनी ओळख होती. त्यामुळे त्याला घराची सर्व माहिती होती. आता घरात प्रवेश करण्यासाठी ड्युप्लिकेट चावी तयार केल्याचं समोर आलं आहे. ही चावी कुणाच्या सांगण्यावरून तयार करण्यात आली याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या दाव्यानुसार, हत्येचा कट 21 दिवसाआधीपासूनच शिजला होता. त्यानंतर आरोपी एकमेकांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यामुळेच हे कॉल्स झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PM मोदींची गुजरातमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल; जेन-झींसमोर नाराज ‘फुफा’ म्हणत डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
  • अमिताभ बच्चन यांच्या नातीचा भरजडीत सोन्याचा ड्रेस, कोट्यवधी आहे किंमत…
  • मनोज जरांगे यांचे समाधान होत नसेल तर… राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका वाक्याने ठिणगी पडणार? मराठा आंदोलनाविषयी म्हणाले काय?
  • Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या… चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
  • घराबाहेरच बड्या संगीतकाराची हत्या… राहुल गांधी संतापले; थेट केंद्रीय गृहमंत्रालय आणि..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in