• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM मोदींची गुजरातमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल; जेन-झींसमोर नाराज ‘फुफा’ म्हणत डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

September 8, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वडोदरामध्ये एका नमो फॉर विकसित भारत कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मोदींनी जेन-झी तरुणांशी संवाद साधला. या संवादाआधी पंतप्रधान मोदींनी हजारो कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण केलं. याच कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांना नाराज फुफा म्हणत टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज मी विकसित भारताच्या यात्रेला गती देण्यासाठी आलो आहे. थोड्यावेळापूर्वी हजारो रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन झालं. मी देशातील जनतेचं अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी सेवाभावातून स्वच्छतेचे अभियान राबवलं. त्यांचे आभार मानतो. काल एक व्हिडिओ बघत होता. गर्व वाटला. आता गणेशोत्सव, नवरात्रीची तयारी आहे. गणेशोत्सव, नवरात्रीत सर्वाचं लक्ष वडोदरावर असते. तुम्ही मागील एका आठवड्यापासून प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेचं वातावरण तयार झालं. गणेशाचं आगमन होईल, त्यावेळी सर्व आशीर्वादाचा वर्षाव वडोदरावर होईल. या वर्षी बालेकिल्ल्यावरून विकसित भारतासाठी संकल्पाच्या सप्तधारेची घोषणा केली. यात एक गतिशक्तीचाही समावेश आहे’.

‘विकसित भारतासाठी एक कनेक्टिव्हिटी हवी, जी काळाच्या पुढे जाणारी हवी. वडोदरा शहर गतिशक्तीचं विद्यापीठ आहे. आज 2800 किलोमीटरहून अधिकचा वेस्टर्न डेडिकेटे फ्रेट कॉरिडॉर झाला. एकविसाव्या शतकात फार मोठं काम झालं आहे. हा कॉरिडॉर याचं प्रतिक आहे की, मागील 12 वर्षांत काम करण्याची संस्कृती बदलली आहे. याचा विचार सुरू झाला, त्यावेळी तुमचा जन्म झाला नव्हता. 2006 साली एक विशेष कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर 2014 पर्यंत फाइलच इकडून तिकडे गेल्या. आता दुर्देव म्हणजे फाइलला देखील कॉरिडॉर नशिबी नव्हता. 2014 साली गुजरातच्या लोकांनी दिल्लीत पाठवलं. आधीचं सरकार 2000 सालापर्यंत होतं. मला पाठवल्यानंतर ते गेले. खरंतर, सात आठ वर्षांत एक किलोमीटर फ्रेट कॉरिडॉरचं काम झालं नाही. त्यांच्या हिशोबानुसार सरकार चाललं असतं, तीन पिढ्या गेल्या तरी झालं नसतं. अशी हाल केले होते, असे ते म्हणाले.

‘ट्रान्सफोर्टचा कायापालट केला आहे. ट्रॅव्हल आणि ट्रान्सपोर्ट गतीशील नव्हते. परंतु या कॉरिडॉरने सर्व बदलून टाकलं. आज दोन्ही कॉरिडॉरवर दररोज 4300 हून अधिक मालगाडी धावतात. आधी मालगाडी साडेसहा तासात 100 किलोमीटर धावायची. आता तीच मालगाडी अर्ध्या वेळात अंतर पूर्ण करते. या कॉरिडॉमुळे इंधनाची बचत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, ‘ नाराज फुफा आहेत, आता ओरडतील. ट्रकवाल्याचं काय होईल. ते कुठे जातील. ज्यांनी ट्रकची खरेदी केली, त्यांचं काय होईल. म्हणजे मोठ्या प्रमाणात साहित्य हे देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाईल. यामुळे जिथे ट्रेन पोहोचली नाही, तिथे पोहोचले. आदिवासी क्षेत्राली लोकही रेल्वेशी जुडले जात आहे. आधी एक दोन ट्रेनची घोषणा व्हायची. आज वर्षभरात नवीन ट्रेन चालवल्या जात आहेत’.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in