• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात

September 8, 2026 by admin Leave a Comment


कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही९ मराठी, मुंबई : पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी मुंबईत पोहचणार आहेत. बीकेसीमधील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ते कार्यक्रमासाठी पोहोचणार आहेत. मात्र याच ठिकाणाहून आता दोघांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या संदर्भात कठोर तपासणी सुरु होती. त्यावेळी यंत्रणांना दोन संशयितांच्या वागण्यात गोंधळ आढळून आला. त्यांनी कार्यक्रम स्थळामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. दोघांपैकी एकाचं नाव रोहन पारेख असून त्याच्यासोबत असलेल्या एका बॉडीगार्डकडे बंदूकही आढळून आली आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधून दोघांना ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला 24 वर्षीय रोहन पारेख याने स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान रोहनकडे PMO कार्यालयाचे बनावट ओळखपत्र आढळल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सुरक्षा तपासणीत ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. रोहनसोबत असलेल्या बॉडीगार्डकडे बंदूक आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे बनावट ओळखपत्र आणि शस्त्रासह कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू केला आहे.

व्हीव्हीआयपी आणि एसपीजी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

देशाचे पंतप्रधान असलेल्या मोदींच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या या मोठ्या प्रश्नामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या दोघांचा नेमका उद्देश काय होता. त्यांनी केलेल्या प्रकारामागचं खरं कारण नेमकं काय याचा तपास आता मुबंई पोलिसांकडून सुरु आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीची सुरक्षा ही व्हीव्हीआयपी आणि एसपीजी कमांडो प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे बंदूक घेऊन व्यक्ती बनावट ओळखपत्र बनवून कार्यक्रमस्थळी पोहोचत असल्याने सुरक्षेच्या प्रश्नावर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या तपासात पुढे काय निष्पन्न होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडून सुरू आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नागपुरात रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच पोहोचला, असं फुटलं बिंग…
  • रक्ताचं पाणी करून निवडून दिलं, आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि…खासदार ओमराजेंवर दानवे यांची टीका
  • DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता लढ्यासाठी वेगळा मंच, मोठी अपडेट समोर
  • ‘आरक्षणाचं गाजर दाखवून सरकार निवडणुका जिंकतं,’ पण…नाना पटोले यांची टीका
  • सांगलीत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; रात्री झोपेत असतानाच… संतापजनक प्रकार समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in