• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ

September 8, 2026 by admin Leave a Comment


Venus Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 11 सप्टेंबरला राशीचक्रात मोठी घडामोड घडणार आहे. शुक्र ग्रह या दिवशी स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. स्वाती नक्षत्राचा स्वामी राहु असून त्याची रास तूळ आहे. शुक्र ग्रहाचं स्वाती नक्षत्रात गोचर होणार असून काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसण्याची शक्यता आहे. या गोचरामुळे कन्या, कर्क आणि कुंभ राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. यामुळे आर्थिक लाभ, नोकरी आणि करिअर निगडीत लाभ मिळणार आहे. या गोचरानंतर गेल्या काही दिवसात अडकलेली कामं मार्गी लागतील. शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन 11 सप्टेंबरला कधी होणार हे सर्व जाणून घेऊयात एका क्लिकवर…

शुक्राचा स्वाती नक्षत्रात गोचर

द्रिक पंचांगानुसार, 11 सप्टेंबर 2026 रोजी शुक्रवारी रात्री 11 वाजून 19 मिनिटांनी शुक्र ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्र स्वाती नक्षत्रात जवळपास दीड महिने राहणार आहे. 24 ऑक्टोबर 2026 रोजी शुक्र पुन्हा चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ग्रह मंडळात एकूण 27 नक्षत्र आहेत आणि स्वाती नक्षत्र 15व्या स्थानावर आहे. स्वाती नक्षत्राचं स्वामित्व राहु ग्रहाकडे आहे. तसेच रास तूळ मानली जाते. या राशीचं स्वामित्व शुक्र ग्रहाकडे आहे. यामुळेच शुक्र ग्रहाचं स्वाती नक्षत्रात प्रवेश करणं खास असणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते…

या राशींना मिळणार लाभ

कन्या : शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ या राशीच्या जातकांना मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगले परिणाम दिसून येतील. गेल्या काही दिवसापासून अडकलेली कामं मार्गी लागू शकतात.

कर्क: या राशीच्या जातकांना शुक्र ग्रहाचा गोचर महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नवी संधी चालून येईल. इतकंच काय तर कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

कुंभ: या राशीच्या जातकांना शुक्राचा गोचर लाभदायी ठरेल. काही सकारात्मक घडामोडींमुळे मनावरील दडपण कमी होईल. तसेच आर्थिक गणित सुटल्याने दिलासा मिळेल. उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळेल. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 9 वा राष्ट्रीय पोषण माह 9 सप्टेंबरपासून सुरू, ‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ मुख्य थीम
  • भारताची रिफॉर्म एक्सप्रेस आणखी वेगाने धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
  • तिकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतके पक्षांतर बंदी कायद्यातच बदल? राहुल नार्वेकरांकडे मोठी जबाबदारी
  • अभिजीत दिपकेंना मोठा धक्का, भाजप नेत्यानं कोर्टात खेचलं; सीजेपीपुढं नवं संकट
  • राज्यात मोठं काही घडणार? ऑपरेशन टायगर होणार का? उदय सामंत पहिल्यांदाच म्हणाले, लवकरच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in