• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दिपकेंना मोठा धक्का, भाजप नेत्यानं कोर्टात खेचलं; सीजेपीपुढं नवं संकट

September 8, 2026 by admin Leave a Comment


प्रमोद जगताप, टीव्ही९ मराठी, मुंबई : सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही या खटल्यामध्ये प्रतिवादी करण्यात आलं आहे. दरम्यान, मानहानीचा हा दावा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. आज 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी दोन कोटींच्या मानहानीचा दावा ठोकल्याचं सांगितलं आहे.

त्यांनी लिहिलं की, “जेव्हा मर्यादा ओलांडून तुम्ही आरोप करता, तेव्हा कायदा त्यासाठी कामी येतो. 2 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला उद्या दिल्ली उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी घेतला केला जाणार आहे. ना सोशल मीडियावरची कुरघोडी आणि ना कुठले शाब्दिक युद्ध. फक्त तथ्य, पुरावे आणि कायदा त्याचे काम करणार आहे. त्यामुळे आता सत्याची पडताळणी जिथे व्हायला हवी तिथेच होईल, म्हणजेच न्यायालयात.”

काय आहे सर्व प्रकरण?

दरम्यान, गौरव भाटिया आणि सौरव दास यांच्यामधील सोशल मीडियावरील वाद पाच सप्टेंबरला सुरु झाला. यामध्ये AI-निर्मित बनावट ग्राफिकद्वारे भाटिया यांच्या नावावर स्वातंत्र्य भारद्वाज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. या ग्राफिकमध्ये भारद्वाज यांना ‘दिमागी नक्षल’ आणि ‘जातिवादी’ म्हटल्याचं भासवण्यात आल्याचा दावा भाटिया यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता.

दरम्यान, सौरव दासकडून पोस्ट हटवण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाटियांना आव्हानही दिलं होतं. त्यांनी सांगितलेलं की, मला वाटलेलं की हे सगळं एआयने बनवलं असेल. पण तरीही मी भाजप नेत्यांना या गोष्टी पुन्हा बोलण्याचं आव्हान देतो. मला नाही वाटतं असं करण्यात त्यांना काही अडचण असेल.

दरम्यान, सौरव यांच्याकडून ही पोस्ट डिलिट केल्यानंतर गौरव भाटिया यांनी म्हटलं होतं की, “पोस्ट फक्त 83 मिनिटांमध्ये हटवली, माफी मागितली नाही. त्यामुले पुढील काळात गुन्हा दाखल करु शकतो. त्यांनी पुढे सांगितलं की, तुम्ही बदनामी करणार, प्रोपोगेंडा सेट करणार आणि मग पोस्ट डिलिट करुन पळून जाणार, हे सगलं एवढं सोप नाही.” त्यामुळे आता या सर्व प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नागपुरात रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच पोहोचला, असं फुटलं बिंग…
  • रक्ताचं पाणी करून निवडून दिलं, आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि…खासदार ओमराजेंवर दानवे यांची टीका
  • DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता लढ्यासाठी वेगळा मंच, मोठी अपडेट समोर
  • ‘आरक्षणाचं गाजर दाखवून सरकार निवडणुका जिंकतं,’ पण…नाना पटोले यांची टीका
  • सांगलीत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; रात्री झोपेत असतानाच… संतापजनक प्रकार समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in