
खान कुटुंबाचा बॉलिवूडमध्ये मोठा दबदबा आहे. सलमान खान (Salman Khan) , अरबाज खान (Arbaaz khan) आणि सोहेल खान (Sohail Khan) अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. सलमानचा मेव्हणा, अर्पिताचा नवरा आयुशही चत्रपटात आला, नंतर सलमानची भाची अलीजेह हिनेही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं. आता खान कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज आहे. सलमानच पुतण्या , अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा , अरहान हा आता काकाच्या आणि वडीलांच्या पावलावर पाऊल ठेऊन फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणार आहे. त्याला अनेक इव्हेंटसमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे,पण तो आता अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. तेही अॅक्सन हिरो बनून..
अॅक्शन चित्रपटातून करणार डेब्यू
‘झूम’च्या रिपोर्टनुसार, सलमान खानचा पुतण्या, अभिनेता अरबाज आणि मलायका यांचा मुलगा अरहान आता बॉलिवूडमध्ये एका अॅक्शन चित्रपटातून एंट्री करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध अय्यर यांनी केलं आहे. त्यांनी यापूर्वी ‘अॅक्शन हिरो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं . अरहानचा डेब्यू चित्रपट एक मोठा अॅक्शन चित्रपट असणार आहे. सध्या या चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे.
यापूर्वी एका मुलाखतीत अरबाज हा त्याच्या मुलाच्या फिल्म इंडस्ट्रीतील एंट्री बाबत बोलला होता. त्याच्यासाठी स्क्रिप्ट माझ्याकडून येऊ शकते किंवा इतर कोणाकडूनही येऊ शकते. सध्या सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष आहे. असं त्याने नमूद केलं.
देशात अनेक चित्रपट निर्माते आहेत आणि प्रत्येकजण नवीन टॅलेंट आणि नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे. जर अरहानसाठी त्याच्यापेक्षा आधी कोणाकडे ऑफर असेल, तर तो त्या ऑफरचा नक्कीच विचार करू शकतो, असंही अरबाजने सांगितलं होतं. माझ्याकडे आता किंवा भविष्यात काही चांगलं काम असेल, तर मी त्याला नक्कीच ऑफर करेन आणि त्याला काय करायचं आहे हे ठरवण्याची संधी देईन, असंही त्याने म्हटलं होतं.
अरहानचा पॉडकास्ट झाला व्हायरल
काही काळापूर्वी अरहानने ‘दम बिर्याणी’ नावाचा पॉडकास्ट सुरू केला होता. तो, त्याचा मित्र देव आणि आरुषसोबत हा पॉडकास्ट होस्ट करत होता. या पॉडकास्टमध्ये त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही हजेरी लावली होती.
अरबाज आणि मलायकाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, अरबाजने 1996 मध्ये ‘दरार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘माँ तुझे सलाम’, ‘ये मोहब्बत है’, ‘सोच’, ‘कुछ ना कहो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने दिग्दर्शक म्हणूनही काम केलंय. सलमान खानच्या ‘दबंग 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याने केलं होतं.
दुसरीकडे, अरहानची आई म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोराही खूप प्रसिद्ध आहे. तिने अनेक हिट गाण्यांमध्ये काम केलंय. त्यामध्ये ‘छैय्या छैय्या’, ‘काल धमाल’, ‘होंठ रसीले’ आणि ‘मुन्नी बदनाम’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.
Leave a Reply