• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raja Shivaji Box Office : महिन्याभरात ‘राजा शिवाजी’ सिनेमाची धूम, 75 कोटीत बनलेल्या चित्रपटाने किती कमावला नफा ?

May 30, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता रितेश देशमुख याचं स्वप्न असलेला आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आहे. या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामाने आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटाचा विक्रम आधीच प्रस्थापित केला आहे. आता या चित्रपटाने पाचव्या आठवड्यात एंट्री केली आहे. चित्रपटाचे प्रदर्शनाचे चार आठवडे खूपच यशस्वी ठरले आहेत. या चित्रपटाने महिन्याभरात किती नफा कमावला ते जाणून घेऊया.

भारतात ‘राजा शिवाजी’ सिनेमाची कमाई किती ?

‘राजा शिवाजी’ सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास एक महिना झाला आहे. सैकनिल्क च्या सुरुवातीच्या ट्रेंड डेटानुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 29 व्या दिवशी भारतात 35 लाखांची कमाई केली. Koimoi च्या डेटानुसार, ‘राजा शिवाजी’ सिनेमाने 28 व्या दिवशी 45 लाख कमावले. चौथ्या गुरुवारी असलेल्या ईदच्या सुट्टीचा या चित्रपटाला फायदा झाला, पण आता त्याला ‘देऊळ बंद 2 ‘ कडून मोठी स्पर्धा सहन करावी लागत आहे. जो मराठी चित्रपटगृहांमध्येही हिट ठरला आहे. याचा परिणाम ‘राजा शिवाजी’सिनेमाच्या कमाईवर झाला आहे.

कोईमोईच्या माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे भारतातील 28 दिवसांत म्हणजेच चार आठवड्यांत एकूण निव्वळ कलेक्शन 103.15 कोटी रुपये झाले आहे, तर त्याचे एकूण कलेक्शन 121.71 कोटी रुपये झाले आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाने किती कमावला नफा ?

रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला आणि त्यानेच दिग्दर्शन केलेला ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे बजेट 75 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाने 28 दिवसांत भारतात 103.15 कोटी रुपये कमावले आहेत. याचा अर्थ, चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या चार आठवड्यांत ‘राजा शिवाजी’मधून 28.15 कोटी रुपयांचा नफा कमावला. टक्केवारीत रुपांतर करायचं झाल्यासं, गुंतवणुकीवर 37.53% रिटर्न दाखवतो. हा ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा भारतात प्रचंड यशस्वी ठरला आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाची स्टार कास्ट

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. इतर कलाकारांमध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, जेनेलिया डिसूझा आणि बोमन इराणी यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सलमान खानचीही या चित्रपटात एक विशेष छोटी भूमिका आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in