• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pune News: गजेंटींचा कहर, आता रेल्वे ट्रॅकवरच नको ते घडले, पुणे हादरले

September 8, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. गुंड आणि टोळक्यांनी शहरात उच्छाद घातलेला असतानाच आता गजेंटीची सुद्धा दहशत दिसून येत आहे. आता रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यालाच या गुंडांनी, टोळक्यांनी टार्गेट केल्याचे समोर येत आहे. गणेशोत्सव आणि सणांच्या काळात अशा घटनांनी दहशत वाढली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्याची मागणी करण्यात येत आहे.

रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

पुण्यात रेल्वे ट्रॅकवर रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गांजा पिणाऱ्या टोळक्याला हटकल्याचा रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याला फटका बसला. हटकल्याचा राग मनात धरत गजेंटींना थेट हल्ला चढवला. टोळक्याकडून पोलिस शिपायावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात रेल्वे पोलिस शिपाई अक्षय बांबल गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या गळ्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पुणे रेल्वे स्टेशन आणि ट्रॅकवरच सर्वसामान्य नागरीक, प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रेल्वे ट्रॅकवरच घडला धक्कादायक हल्ला

पोलीस कर्मचारी अक्षय बांबल हे रेल्वे ट्रॅकजवळून जात होते. त्यांना काही गंजेटी दिसले. त्यांनी त्यांना हटकले. त्याचा मनात राग धरून बांबल यांच्यावर हल्ला करण्यात आला. रेल्वे ट्रॅकवरच हा धक्कादायक हल्ला घडला. गांजा पिणाऱ्यांना हटकल्याने आरोपींकडून पोलिस कर्मचाऱ्याला लक्ष्य करण्यात आले. या घटनेत बांबल हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी अक्षय बांबल यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पुणे रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवाशी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्लेखोरांचा रेल्वे पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वीच अशा घटना घडत असल्याने पुणेकरांनी चिंता व्यक्त केली आहे.

गांजा विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे पोलीस तपासात यापूर्वी उघड झाले. प्रकरणात एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलीस ठाणे पोलिसांनी ही एका विधिसंघर्षित बालकालाविरोधात कारवाई केली आहे. हडपसरमधील सुरक्षानगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गांजा, मोपेड, मोबाईल आणि इतर साहित्य असा 11 लाख 44 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने ही कारवाई केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 21 दिवसात 330 वेळा कॉल्स… करोडपती सून नोकराला का करायची फोन? चक्रावणाऱ्या हत्याकांडाचं…
  • जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक, सरकारकडून..
  • Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
  • Million Dollar Grits: चमचमीत नाश्ता हवाय? असे तयार करा मलाईदार आणि चवदार ग्रिट्स
  • पेपरफुटी प्रकरणात संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट; भाजपवर काय केले आरोप?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in