
भाजप नेते नितेश राणे यांनी आज डीजे बंदीच्या मुद्यावर बोलताना आक्रमकपणे भूमिका मांडली. “किती मुल्ला,मौलवी महिलांबद्दल बोलताना अपशब्द बोलतात. महिला, बायकांचा उल्लेख करतात. तुम्ही जिहाद केला, तर मेल्यानंतर 72 हूर भेटतील, त्यासाठी तु्म्ही जिहाद करा. असं आव्हान करणाऱ्या लोकांवर का कोणी बोलण्याची हिम्मत करत नाही” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. “सर्वच आमच्या हिंदू धर्माच्या संतांबद्दल, त्यांना का बदनाम केलं जातय. आमच्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करताय. आमच्या सणासुदीला भितीचं वातावरण निर्माण करता. हिम्मत असेल तर ईदच्या आधी बोलून दाखवा” असं नितेश राणे म्हणाले. “हिंदुंच्या सणांना का बदनाम केलं जातय? मुस्लिमांच्या कार्यक्रमात इतरांना परवानगी नसते तसचं दांडियाच्या कार्यक्रमात मुस्लिमांना परवानगी नकोच” असं नितेश राणे म्हणाले. “जिहादी गरब्याच्या कार्यक्रमात जाण्यासाठी काहीही नाव सांगतो. डीजेचा त्रास सगळ्यांना होत असेल, तर ईद, हिंदू सणांना बंद झालाच पाहिजे” अशी भूमिका नेतश राणे यांनी मांडली.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply