• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू भारताबद्दल जे बोलले..खरचं भारतीयांना त्यांनी जिंकलं, पण पाकिस्तानला चांगलचं फटकारलं

May 29, 2026 by admin Leave a Comment


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू नेहमीच भारताचं कौतुक करत असतात. ते भारतासोबतचे संबंध दृढ करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संधी मिळेल तेव्हा नेतन्याहू भारताबद्दल भरभरुन बोलत असतात. वेस्ट बँक येथे एका कॉन्फरन्समध्ये बोलताना नेतन्याहू यांनी भारताचं भरपूर कौतुक केलं. भारत विशाल शक्ती असून इस्रायलसोबतच्या अनोख्या संबंधांबद्दल नेतन्याहू बोलले. “जगातील अनेक भागात आम्हाला आमच्या मान्यतेसाठी संघर्ष करावा लागतो, अडचणी येतात. पण भारतात असं नाहीय. भारतात इस्रायल प्रती जबरदस्त समर्थन आहे. जगातील अन्य कुठल्या देशांच्या तुलनेत भारतात आमचे समर्थक सर्वात जास्त आहेत” असं नेतन्याहू म्हणाले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

फेब्रुवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी इस्रायलने मोदींच्या आदिरातिथ्यात कुठलीही कमतरता ठेवली नाही. त्यांना विशेष मान-सन्मान दिला. भारतातही नेतन्याहू लोकप्रिय आहेत. 2018 साली ते पत्नी सारासोबत भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याला त्यांनी प्रेम उत्सव ठरवलं. भारतीयांच्या मनात इस्रायल बद्दल खूप आदराची भावना आहे असं ते म्हणाले.

ते प्रेम उत्सवासारखं

“काही अशा जागा आहेत, जिथे अजूनही इस्रायलचा सन्मान केला जातो असं एका कार्यक्रमात ते म्हणाले. 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतात इस्रायल लोकप्रिय देश आहे. इथे पीएम मोदींच खूप प्रेमाने, अगत्याने स्वागत केलं होतं. मी माझी पत्नी सारासोबत तिथे गेलो होतो, ते प्रेम उत्सवासारखं होतं” असं नेतन्याहू म्हणाले.

अमेरिकेत इस्रायलबद्दल नकारात्मक मत

सततच्या युद्धखोरीमुळे जगात इस्रायलला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागतो. नेतन्याहू यांच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झालेली असताना त्यांनी हे स्टेटमेंट केलय. एप्रिल महिन्यात प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेनुसार 60 टक्के वयस्कर अमेरिकी नागरिकांचं इस्रायलबद्दल नकारात्मक मत आहे. मागच्यावर्षी हा आकडा 53 टक्के होता.

पाकिस्तानला धरलं जबाबदार

नेतन्याहू यांनी आपल्या लोकप्रियतेत जी घसरण झाली, त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. पाकिस्तान अमेरिकी जनतेच्या मनात इस्रायल विरोधी भावना वाढीस लावत असल्याचा नेतन्याहू यांचा आरोप आहे. ज्या देशांना अमेरिका-इस्रायलचे संबंध कमकुवत करायचे आहेत, ते सोशल मीडियाचा वापर करत आहेत असं नेतन्याहू म्हणाले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!
  • चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?
  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in