
VBA Prakash Ambedkar : मुंबई महापालिका ही नेहमीच राज्यात चर्चेचा विषय असते. गेल्या काही दिवसांत मुंबई पालिकेने घेतलेल्या काही निर्णयांवर टीका करण्यात आली. दरम्यान, आता यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट नाकारल्याचा दावा केला जातोय. अश्विनी भिडे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आता केली जातेय.
प्रकाश आंबेडकर हे मुंबई…
मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट नाकारल्याचा दावा केला जातोय. भेट नाकारण्याचं कारण पालिका आयुक्तांनी सांगितलेलं नाही. दरम्यान, अश्विनी भिडे यांनी भेट नाकारल्यानंतर वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ‘प्रकाश आंबेडकर हे मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण दुसरीकडे पालिका आयुक्त मात्र ही बैठक नाकारत आहेत. बाळासाहेबांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी या सक्षम नाहीत का? किंवा त्या कोणाच्यातरी दबावाखाली त्या काम करत असाव्यात म्हणूनच त्या बैठक नाकारत आहेत,’ असा गंभीर आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्याने केला.
आयुक्त उपस्थितच राहणार नसतील तर….
तसेच, कामगारांचा रोष पाहून पालिका आयुक्तांच्या पीएचा फोन येतो की मॅडम तुमच्यासाठी थांबल्या आहेत. म्हणजे कामगारांनी रोष केल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचे तुम्हाला समजते. काहीतरी होणार असल्याची भीती असल्याने त्या भेटा असं म्हणत आहेत. डीसीपीच्या मागणीनंतर आम्ही त्यांना भेटायला आलो. पण इथे आल्यावर पालिका आयुक्त उपस्थितच नाहीत, असे समजल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. तसेच पालिका आयुक्त उपस्थितच राहणार नसतील तर मग आम्हाला वेळ कशाला देता? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
अश्विनी भिडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागावी
मुंबई पालिकेचा कामगार जेव्हा काम करतो, तेव्हा पालिका आयुक्तांच्या खुर्चीला शोभा येते. नाहीतर तुमच्या खुर्चीला किंमतच नाही. चौथ्यांदा पालिका आयुक्तांनी भेट नाकारली आहे. सोमवारच्या दिवशी तीन ते पाच हा काळ त्यांच्या भेटीचा काळ आहे, असे सांगत अश्विनी भिडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागावी, अशी मोठी मागणी त्यांनी केली.
Leave a Reply