• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nepal Flood : मोठं रहस्य… 5000 नागरिक बेपत्ता, पण 900 लोकांनाच का शोधतंय नेपाळ? हैराण करणारं कारण आलं समोर

September 8, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये भयानक महापूर आणि भूस्खलन होऊन 13 दिवस उलटले आहेत. अजूनही नेपाळमधील शेकडो नागरिक बेपत्ता झाले आहेत. तब्बल 5 हजार नागरिक या महाप्रलयात बेपत्ता झाले आहेत. मात्र, नेपाळ सरकारने केवळ 900 कर्मचाऱ्यांना शोधण्यावर अधिक फोकस दिला आहे. त्यामुळे सर्वच थक्क झाले आहेत. नेपाळ सरकारने केवळ 900 नागरिकांना शोधण्यावरच इतका भर का दिला आहे? याची चर्चा आता जगभर सुरू झाली आहे. त्याचं कारण समोर आल्यानंतर मात्र सर्वच हैराण झाले आहेत.

नेपाळ सरकारने ज्या 900 कर्मचाऱ्यांना सर्व फोकस केंद्रीत केला आहे. ते सर्व हायड्रोइलेक्ट्रिक योजनेत काम करणारे कर्मचारी आहेत. हे कर्मचारी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना या योजनेची इत्थंभूत माहिती आहे. त्यामुळेच या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी नेपाळ सरकारने जीवाची बाजी लावली आहे. सोमवार नेपाळच्या बचाव पथकाने चिनी सीमेला लागून असलेल्या हिमालयाच्या परिसरातील हायड्रोइलेक्ट्रिक योजनेतील सुरुंगामध्ये अडकलेल्या लोकांना शोधण्याचं काम सुरू केलं. हे 900 कर्मचारी 121 सुरुंगांमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळेच बचाव पथकाने त्यांना शोधण्यासाठी लक्ष केंद्रीत केलं आहे.

ते जिवंत असतील…

सैन्याच्या बचाव पथकाच्या मतानुसार, हायड्रोइलेक्ट्रिक योजनेतील बेपत्ता लोक सुरुंगाच्या आत नाहीये. इतर लोक पॉवर प्लांटच्या दुसऱ्या भागात काम करत होते. पण सुरुंगांमध्ये काही लोक जिवंत असण्याची शक्यता आहे. मदत कार्यात सहभागी असलेले खासदार राम न्यूपाने यांनीही याबाबतची माहिती दिली आहे. रसुवा जिल्ह्यातील चिलमे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर योजनेतील सहा पैकी चार कर्मचाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. हे लोक जिवंत असतील अशी आशा आहे. अधिकाऱ्यांनी चिलिमे योजनेसाठी आवश्यक खास उपकरण आणि तंत्रज्ञान मिळवलं आहे, असं न्यूपाने यांनी सांगितलं. तर, बचाव पथकाच्या मते, सुरुंगात हवा जाण्यासाठीचे मार्ग आहेत. त्यामुळे सुरुंगातील रुममध्ये अडकलेले कर्मचारी जिवंत असण्याची शक्यता आहे. मात्र, सुरुंगात किती लोक अडकलेत हे अद्याप सांगता येणार नाही.

त्या चार लोकांमुळे

नेपाळमध्ये चार लोकांना ढिगाऱ्या खालून जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. शनिवारी एका चिनी नागरिकाला सुरुंगातून जिवंत बाहेर काढण्यात आलं. शुक्रवारी हायड्रोइलेक्ट्रिक कर्मचाऱ्याला दुसऱ्या सुरुंगातून जिवंत बाहेर काढलं. त्यामुळे बचाव कार्य करणाऱ्या आणि अनेक कुटुंबाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, आपत्तीला 13 दिवस उलटल्यानंतरही लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं अजूनही कठिण झालं आहे.

चीनवर दबाव

चीनने रविवारी एक महत्त्वाची माहिती दिली. चीनच्या मते तिबेटमध्येही अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. बचाव पथकाने या लोकांचा शोध घेतला असता 12 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. मानसरोवर आणि माऊंट कैलाशच्या यात्रेसाठी भारतीय नागरिक तिबेटला आले होते. त्यांनाही पुराचा फटका बसला. चीनने या सर्व नागरिकांचा शोध सुरू केला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, तिबेटमध्ये अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. त्यात विदेशी नागरिकही आहे. या विदेशी नागरिकांनी आता चीनवर माहितीसाठी दबाव टाकला आहे. आमच्या नागरिकांची माहिती जारी करा, असं या विदेशी नागरिकांनी म्हटलं आहे. त्यामुळे चीनची मोठी कोंडी झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in