• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Narsapur Case : नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट

June 29, 2026 by admin Leave a Comment


नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे. मे महिन्यात ही घटना घडली होती. संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणाने हादरवून सोडलं होतं. आरोपी भीमराव कांबळेने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. 1 मे 2026 रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. पुणे शिवाजी नगर येथील विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मागच्या आठवड्यात दोषी ठरवलं होतं.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला बोलवून तिच्यावर अत्याचार केला होता.प्राथमिक तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झालं होतं. पुण्यातील भोर तालुक्यामधील नसरापूरमध्ये ही घटना घडली होती.

“नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाईल. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानून कोर्टाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी” अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. “कोर्टात आज युक्तीवाद होणार नाही. आरोपीला हजर करुन शिक्षेची सुनावणी होईल अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. आरोपीचा मागचा इतिहास बघता तो सुधारु शकत नाही. कोर्टाने हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानून आरोपी मृत्यूदंड द्यावा” अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

तुला कोणती शिक्षा द्यायची?

आरोपी भीमराव कांबळेने चिमुकलीचा निर्घृण खून केल्यानंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवला होता. सीसीटीव्ही आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आलं होतं. नसरापूरच्या या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अंतिम सुनावणी न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळे याला तुला कोणती शिक्षा द्यायची, फाशीची की जन्मठेपेची, अशी विचारणा कोर्टाने केली होती.

फास्ट ट्रॅकवर सुनावणी

न्यायालयीने इतिहासात या खटल्याची जलदगतीने सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे हा 65 वर्षांचा आहे. या घटनेनंतर संतापून नागरिक स्वत: रस्त्यावर उतरले होते. जनतेचा संपात लक्षात घेत सरकारने फास्ट ट्रॅकवर या खटल्याची सुनावणी केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 18 कोटींचा बजेट, कमावला 190% नफा.. नेटफ्लिक्सवर येताच ‘या’ चित्रपटाने ‘राजा शिवाजी’ सिनेमालाही टाकलं मागे
  • IND vs IRE: ‘IPL मुळे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका गमावली’ माजी खेळाडू असं का म्हणाला?
  • मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
  • त्यात काय खास होतं? ‘सैय्यारा’च्या यशावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला, “फक्त नशिबाने..”
  • भारतीय जमिनीवर चीनचा कब्जा, बॉर्डरवर धक्कादायक घडामोडी, थेट चीनींनी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in