• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mount Everest : ..म्हणून कुटुंबाने गिर्यारोहक अरुण कुमार यांचा मृतदेह माउंट एव्हरेस्टवरच सोडण्याचा घेतला निर्णय

May 28, 2026 by admin Leave a Comment


माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर सर करणं सोपं नाही. माउंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. अरुण कुमार तिवारी यांनी सुद्धा हेच स्वप्न पाहिलं होतं. अरुण कुमार तिवारी हे मूळचे हैदराबादचे आहेत. माउंट एव्हरेस्ट शिखरावरुन उतरत असताना त्यांना मृत्यूने गाठलं. माउंट एव्हरेस्टवर चढताना आणि उतरताना निसर्गाशी सामना असतो. मागच्या आठवड्यात अरुण कुमार तिवारी यांचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाने त्यांचा मृतदेह माउंट एव्हरेस्टवरच सोडण्याचा निर्णय घेतला. हा त्यांच्या कुटुंबासाठी कठीण निर्णय होता. पण अरुण कुमार तिवारी यांच्या कुटुंबाने असा निर्णय घेण्यामागे काही कारणं आहेत.

कुटुंबाने अरुण कुमार यांचा मृतदेह तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला यामागे पहिलं कारण धार्मिक आहे. दुसरं कारण मृतदेह तिथून परत आणणं आव्हानात्मक आहे. तेलंगणमधून येणारे अरुण कुमार 53 वर्षांचे होते. ते व्यावसायिक आणि अनुभवी गिर्यारोहक होते. हिलरी स्टेप जवळ त्यांचा मृत्यू झाला. उतरताना ते आजारी पडले. चार शेरपा गिर्यारोहक सहाय्य करण्यासाठी त्यांच्यासोबत होते. अरुण कुमार यांचे मेहुणे सुधीर उपाध्याय यांनी सांगितलं की, माउंट एव्हरेस्ट हे भगवान शिवशंकराचं निवासस्थान असल्याची कुटुंबाची धारणा आहे. तिथेच त्यांनी कायस्वरुपी राहणं कुटुंबाला योग्य वाटतं हे मृतदेह परत न आणण्यामागचं पहिलं कारण झालं. दुसरं कारण म्हणजे इतक्या उंचीवरुन मृतदेह परत आणण्यात अनेक नैसर्गिक आव्हानं आहेत. त्यामुळे कुटुंबाने मृतदेह तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला. हे दुसरं कारण झालं.

निर्सग गिर्यारोहकांची परीक्षा पाहतो

अरुण कुमार तिवारी हे सिनियर आयटी प्रोफेशनल होते. मागच्यावर्षी ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचण्यात अपयशी ठरले होते. पण यावर्षी त्यांनी ते सर केलं. 21 मे रोजी शिखरापासून थोडं खाली त्यांना काळाने गाठलं. तिथे नेमका कशामुळे त्यांचा मृत्यू झाला ते स्पष्ट नाहीय. पण माउंट एव्हरेस्टवर चढाई आणि तिथून सुरक्षित परत येणं आव्हानात्मक असतं. निर्सग गिर्यारोहकांची परीक्षा पाहतो. तिथल्या वातावरणात सतत चढ-उतार होत असतात. त्याच्याशी जुळवून घेणं सोपं नसतं. अनेकांना पहिल्या प्रयत्नाना एव्हरेस्ट सर करणं जमत नाही. अरुण कुमार तिवारी सुद्धा त्यापैकीच एक होते. पण एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी प्रचंड अनुभव गाठिशी असणं आवश्यक असतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in