• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत

August 24, 2026 by admin Leave a Comment


गुगलने गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारपेठेत त्यांचे नवीन स्मार्टवॉच पिक्सेल वॉच 5 लाँच केले. या नवीन स्मार्टवॉचमध्ये 3000-निट ब्राइटनेसचा डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन डब्ल्यू5 जेन 2 ॲक्सिलरेटेड प्रोसेसर आहे. यात ड्युअल-चिप आर्किटेक्चर आणि सुधारित जेमिनी इंटिग्रेशन आहे. हेल्थ ट्रॅकिंगसाठी कंपनीने हेल्थ गार्डियन आणि ब्रीदिंग इमर्जन्सी डिटेक्शन यांसारखी नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत. 45 मिमी मॉडेल एका चार्जवर 40 तासांपर्यंत चालते असा दावा करण्यात आला आहे. चला तर मग या स्मार्ट वॉचची किंमत आणि उपलब्धता जाणून घेऊयात.

किंमत, रंग आणि विक्री

गुगल पिक्सल वॉच 5 च्या 41 मिमी मॉडेलची किंमत 42 हजार 999 रूपये असून ते 130 ते 210 मिमी हाताच्या मनगटांसाठी डिझाइन केलेले आहे. हे फॉग ॲक्टिव्ह बँडसह पॉलिश्ड सिल्व्हर ॲल्युमिनियम केस आणि कॅनियन ॲक्टिव्ह बँडसह शॅम्पेन गोल्ड ॲल्युमिनियम केसमध्ये उपलब्ध आहे.

तर यातील 45 मिमी मॉडेलची किंमत 45 हजार 999 रूपये असून ते 150 ते 215 मिमी मनगटांसाठी योग्य आहे. हे ऑलिव्ह ॲक्टिव्ह बँडसह सॅटिन पायराइट ॲल्युमिनियम केस आणि ऑब्सिडियन ॲक्टिव्ह बँडसह मॅट ब्लॅक ॲल्युमिनियम केसमध्ये उपलब्ध आहे.

पिक्सल वॉच 5 साठी प्री-ऑर्डर सध्या सुरू असून विक्री 20 ऑगस्टपासून सुरू होईल. जागतिक बाजारपेठेत 45 मिमी स्टीफन करी स्पेशल एडिशन देखील सादर करण्यात आले आहे, ज्याची किंमत 579 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 55 हजार रूपयांच्या आसपास असेल.

3000 निट्स डिस्प्ले आणि ड्युअल-चिप प्रोसेसर

पिक्सेल वॉच 5 मध्ये गोलाकार डिझाइन असलेला डोमड ॲक्टुआ 360 अमोलेड एलटीपीओ डिस्प्ले आहे. यात 3000 निट्सपर्यंतची पीक ब्राइटनेस, 320 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी आणि 60 हर्ट्झपर्यंतचा ॲडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट मिळतो. यात ऑलवेज-ऑन डिस्प्लेलाही सपोर्ट आहे आणि स्क्रीनला स्क्रॅचपासून वाचवण्यासाठी कस्टम कॉर्निंग गोरिला ग्लास दिलेला आहे.

हे वॉच कॉर्टेक्स-एम55 को-प्रोसेसरसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन डब्ल्यू5 जेन 2 ॲक्सिलरेटेड प्लॅटफॉर्मवर चालते. गूगलच्या मते, मागील पिक्सेल वॉच 4 च्या तुलनेत ड्युअल-चिप आर्किटेक्चरमुळे 20 टक्के अधिक चांगली कामगिरी, 50 टक्के अधिक रॅम आणि 12 टक्के सीपीयू बूस्ट मिळतो. यात 64 जीबी ईएमएमसी स्टोरेज देखील आहे.

जेमिनी आणि हेल्थ गार्डियनकडून आरोग्य ट्रॅकिंग

पिक्सेल वॉच 5 मध्ये सुधारित जेमिनी इंटिग्रेशन आहे. वापरकर्ते या वॉचमधून जेमिनीशी संवाद साधू शकतात तसेच जीमेल आणि कॅलेंडरसारख्या गूगलच्या मदतीने महत्त्वाच्या माहिती देखील मिळवू शकतात. हेल्थ ट्रॅकिंगमध्ये एट्रियल फायब्रिलेशन (AFib) डिटेक्शनसह ईसीजी, उच्च आणि कमी हृदय गती अलर्ट, विश्रांतीच्या वेळची हृदय गती, रक्तातील ऑक्सिजन (SpO2), एचआरव्ही, श्वसन दर, त्वचेच्या तापमानातील बदल आणि रिअल-टाइम स्ट्रेस ट्रॅकिंग यांचा समावेश आहे.

स्लीप ट्रॅकिंगमध्ये श्वासोच्छवासाच्या पद्धती आणि वैयक्तिकृत स्लीप स्कोअरचा समावेश आहे. नवीन हेल्थ गार्डियन रक्तदाबातील ट्रेंड, झोपेतील श्वासोच्छवासाची गुणवत्ता आणि इन्सुलिन रेझिस्टन्सच्या ट्रेंडबद्दल मासिक माहिती प्रदान करतो.

ब्रीदिंग इमर्जन्सी डिटेक्शन आणि 40 तासांची बॅटरी

पिक्सेल वॉच 5 मध्ये ‘ब्रीदिंग इमर्जन्सी डिटेक्शन’ हे वैशिष्ट्य देखील आहे, ज्याला गूगलने स्मार्टवॉचसाठी उद्योगातील पहिले वैशिष्ट्य म्हटले आहे. हे डिव्हाइसवरील एआय (AI) सोबतच पीपीजी (PPG), ॲक्सेलेरोमीटर आणि बॅरोमीटर सेन्सर्सचा वापर करून ऑक्सिजनच्या पातळीतील तीव्र आणि सततच्या घसरणीवर लक्ष ठेवते. हे स्मार्टवॉच 50 हून अधिक ॲक्टिव्हिटीजला सपोर्ट करते आणि रिअल-टाइम ऑडिओ व व्हिज्युअल मार्गदर्शन, साप्ताहिक कार्डिओ गोल्स आणि दैनंदिन सज्जता स्कोअर दर्शवते. यात अपग्रेडेड ड्युअल-फ्रिक्वेन्सी जीपीएस आहे, जे मागील पिढीच्या तुलनेत दोन पटीने अधिक अचूक मार्ग ट्रॅकिंग देण्याचा दावा करते. 41 मिमी मॉडेल 30 तासांपर्यंत आणि 45 मिमी मॉडेल 40 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देऊ शकते. 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 15 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते असा दावा केला जातो. याला (IP68) रेटिंग देखील आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
  • आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती टक्के निधी मिळणार? फॉर्मुला ठरला, मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट
  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in