• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj jarange : मनोज जरांगेंच्या लढ्याला यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत महत्वाची अपडेट समोर

September 8, 2026 by admin Leave a Comment


मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. मराठा आंदोलक जरांगे हे मागील 10 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अंतरावाली सराटीत उपोषणाला बसल्यानंतर मंत्र्‍याच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. सरकारमधील अनेक दिग्गज नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहेत. फडणवीस सरकारमधील काही मंत्री हे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. दोन नेत्यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची फोनवरून विचारपूस केली. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येऊन उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर जालन्याती कुणबी प्रमाणवाटपाची माहिती समोर आली आहे.

जालना जिल्ह्यात 18 हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्राचं वितरण झालंय. प्रशासनाकडून 18 हजार 243 अर्ज मंजूर झाले आहेत. तर 19 अर्ज प्रशासनाकडून नाकारण्यात आले आहे. तसेच एका शासन निर्णयानुसार 421 अर्ज प्राप्त झाले आहेत. न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 1597 अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यापैकी 1 हजार 5 अर्ज वैध झाले आहेत.

किती अर्ज मंजूर?

जालना जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. या जात प्रमाणपत्र वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीत मोठ्या प्रमाणावर अर्जाचा निपटारा झाल्याचं वास्तव प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्ह्यात 18 हजार 262 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 18 हजार 243 अर्ज मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच दुसरीकडे हैदराबाद गॅझेटवर आधारित 2 सप्टेंबर च्या शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या स्वतंत्र आकडेवारी मध्ये जालना जिल्ह्यात एकूण 421 अर्ज प्राप्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

जात प्रमाणपत्रासाठी शिबीर

जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर प्रशासकीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे. कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबीर आयोजित केले जात आहेत. जात प्रमाणपत्रासाठी जुन्या नोदी आणि आवश्यक कागदपत्रांसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नये, यासाठी प्रशासन प्रक्रिया सोपी करत आहे. यासाठी प्रशासनाकडून जालन्यातील आठ तालुक्यातील एकूण 62 मंडळामध्ये 16 सप्टेंबरपर्यंत शिबिरे घेतली जाणार आहे. तसेच तक्रार निराकरणासाठी प्रशासनाकडून नोडल अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in