
अभिनेत्री आणि भाजपची खासदार कंगना राणावत आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. कंगना राणावतने तर रामदेव बाबांची उरलीसुरली सर्वच काढली आहे. कंगनाने जंतरमंतरवरील आंदोलन करणाऱ्यांना जेनजींना गटर जनरेशन म्हटलं होतं. त्यानंतर रामदेव बाबांनी कंगनावर पर्सनल कमेंट केली होती. त्यामुळे कंगना चांगलीच दुखावली गेली असून तिने रामदेव बाबांची चांगलीच काढली आहे. तुम्ही माझ्या जवानीची चिंता करू नका. तुम्ही तारुण्यात काय बेडरूममध्ये वटवाघुळासारखे लटकलेले होते का? अशा शब्दात कंगनाने रामदेव बाबांचा समाचार घेतला आहे.
रामदेव बाबा आणि कंगना राणावतमधील वाद काही केल्या संपताना दिसत नाहीये. डीडी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने पुन्हा एकदा रामदेवबाबांवर निशाना साधला आहे. रामदेवबाबांची जेव्हा स्वदेशी चळवळ सुरू झाली होती, तेव्हा सरकारनेही त्यांना पाठबळ दिलं होतं. मला वाटतं आता रामदेवबाबा कॅपिटेलिज्ममध्ये खूपच गुंतले आहेत. सनातनी विचारधारा तर भांडवलशाहीशी क्लॅश करते. रामदेव बाबा भांडवलदार झाले आहेत. त्यांनी लोकांची जमीन हडप केली आहे. लोक आक्रोश करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात फटकारलं आहे. त्यांना आर्युर्वेद, जडीबुटी, औषधी, योगपासून प्रेरणा मिळाली होती. पण आता ते बनियान, अंडरगार्मेंट्स यात भांडवल शोधत आहेत. ते पूर्णपणे व्यावसायिक झाले आहेत, असा हल्ला कंगनाने चढवला.
अंडरगार्मेंट्स सनातनी आहे काय?
रामदेव बाबा उद्योगपती झाले यावर काहीच हरकत नाहीये. पण मग तुम्ही सनातनी वस्त्र घालू नये. रामदेवबाबा ज्या बनियान आणि अंडरगार्मेंट्स विकत आहेत, त्या सनातनी आहेत काय? त्यात त्यांचं ढोंग आणि दांभिकता दिसत आहे. रामदेवबाबांसारखे लोक सनातनींना अपमानित करणार असेल तर कोण सहन करेल?, असा सवाल कंगनाने केला. तसेच हिंदू धर्मानुसार मार्गक्रमण करणं ही एक तपस्या असल्याचंही ती म्हणाली.
अशी काय जवानी पाहिली?
दरम्यान, कंगनाने आंदोलकांना गटर जनरेशन म्हटलं आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं रामदेव बाबांना विचारण्यात आलं होतं. त्यावर रामदेव बाबांनी कंगनावर सडकून टीका केली होती. कंगनाने तिचं बालपण पाहिलं असेल. ते काय होतं? तिने तिची जवानी पाहिली आहे काय?, असा सवाल रामदेव बाबांनी केला होता. त्यावर कंगनाने पलटवार केला. रामदेवबाबा काय त्यांच्या तारुण्यात बेडरूममध्ये वटवाघूळ बनून उलटे लटकलेले होते का? तुम्ही काय पाहिलं? काय पाहिलं? हे सांगितलं पाहिजे. अशा प्रकारच्या थुकरट गोष्टी करणं त्यांना शोभत नाही. माझं बालपणही इतर मुलींसारखंच गेलं. काही रिलेशनशीप होत्या. त्या सर्वांना माहीत आहे. त्यापेक्षा त्यांनी काय अशी माझी वेगळी जवानी पाहिली? त्यांनी काही मर्यादा सोडू नये, असा संताप कंगनाने व्यक्त केला.
Leave a Reply